विनायककाका पाटील यांचे एक हजार भाजप सदस्य पुर्ण

0
186

माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : भारतीय जनता पक्ष सदस्यता अभियानाचे एक हजार सदस्य विनायककाका पाटील यांनी पुर्ण केले आहे. त्याबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विनायककाका पाटील यांचे अभिनंदन केले.

 

 

यावेळी बोलताना विनायककाका पाटील म्हणाले, भाजप नोंदणीसाठी लोकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे. कार्यकर्ते देखील तितकेच उत्साही आहेत. या सदस्य नोंदणीच्या माध्यमातून शासकीय योजनेची माहिती त्या सदस्यापर्यंत पोहोचवली जाणार आहे. केवळ निवडणूक म्हणून नव्हे तर इतर वेळी देखील चोवीस तास नागरिकांची सेवा होणे या उद्दिष्टाने भाजपचे काम सुरू राहणार आहे.

 

 

तसेच राज्यभरात तब्बल 25 लाख सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट घेऊन भाजपकडून राज्यभरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे. सर्वच स्तरातून आणि वर्गातून भाजप सदस्य नोंदणीसाठी अगदी स्थानिक पातळी वरील नेत्यापासून ते आमदार खासदारांसह भाजप पदाधिकाऱ्यांची प्रयत्नांची परकाष्टा सुरू आहे. आटपाडी तालुक्यासह खानापुर मतदार संघात भाजप पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रयत्न सुरू आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here