
सोशल मीडियावर दर दिवशी अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होतात. आता शिवजयंती निमित्त त्यासंबंधित अनेक व्हिडीओ चर्चेत आले आहेत. काही लोक छत्रपती शिवाजी महाराजांवर गाणी गाताना दिसताहेत तर कोणी भाषण करताना दिसताहेत. कोणी पोवाडा गाताना दिसताहेत तर कोणी महाराजांच्या गडकिल्ल्यांना भेट देताना दिसताहेत. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक शाहीर रेल्वेमधून प्रवास करताना दिसत आहे. जेव्हा रेल्वेमध्ये शाहीर प्रवास करतो, तेव्हा नेमकं काय घडते, हे तुम्हाला दिसून येईल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक शाहीर रेल्वेतून प्रवास करत आहेत आणि प्रवास करताना हा शाहीर पोवाडे गाताना दिसत आहेत. शिवरायांचे पोवाडे गात हा शाहीर समाजप्रबोधन करताना दिसत आहे. ते सुंदर पोवाडा गाताना दिसतात. या पोवाड्यातून ते शिवरायांचा जन्म, राजमाता जिजाऊं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्याचे स्मरण करताना दिसतात. त्यांच्या या पोवाड्यात इतर प्रवासी सुद्धा सहभागी होतात. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. जेव्हा शाहीर रेल्वेतून प्रवास करतात तेव्हा रेल्वेचे सर्व वातावरण शिवमय होते.
“जेव्हा रेल्वे मध्ये शाहीर येतात तेव्हा ऐतिहासिक वातावरण” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “जय शिवराय, जय शंभू राजे” तर एका युजरने लिहिलेय, “आपली संस्कृती अशीच जपा जय शिवराय” आणखी एका युजरने लिहिलेय, “एकच नंबर भावा” एक युजर लिहितो, “रेल्वेत असे दररोज पोवाडे गायले पाहिजे.
खूप छान भावा. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे” तर एक युजर लिहितो, “खूपच सुंदर पोवाडा गायला गेला! ही काळाजी गरज आहे,, जय शिवराय जय शंभू राजे”