
सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात; ज्यामध्ये काही आपलं मनोरंजन करणारे असतात, तर काही आपल्याला भावूक करणारे.फेब्रुवारी हा प्रेमाचा महिना म्हणून ओळखला जातो. प्रेमीयुगुलांसाठी ह्या महिन्यात काही खास दिवस असतात. आजकाल तरूण- तरूणी पासून मोठ्यापर्यंत सर्वांमध्येच व्हॅलेंनटाईन आठवडा साजरा करण्याचा नवा ट्रेंड सुरू झाला आहे.मात्र यावेळी कपलंच ठीक आहे मात्र सिंगल लोकांना काय करायचं असा प्रश्न पडतो अशाच एका तरुणानं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. हा तरुण एक पाटी घेऊन उभा होता. या पाटीवर असं काही लिहलं आहे की पाहून सगळ्या मुली थांबू लागल्या. फक्त थांबल्याच नाही तर लाजल्या सुद्धा. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून सोशल मीडियावर याच पाटीची चर्चा सुरु आहे.
पुणेरी पाट्या तर जगभरात प्रसिद्ध आहेतच, मात्र आता ही पाटी वाचली तर तुम्हीही पोट धरुन हसाल. एका बाजारामध्ये हा तरुण एवढ्या गर्दीत रस्त्यावर उभा राहून एक पाटी झळकवत आहे. या पाटीवर तरुणानं असं काही लिहलं आहे की पाहून तम्हीही हसाल. खास करुन सिंगल मुलांसाठी त्यानं या पाटीवर हा आशय लिहला आहे. आता तुम्ही म्हणाल असं लिहलंय तरी काय? तर या तरुणानं पोस्टरवर “नाही माझ्याकडे पप्पाची परी म्हणून मी बसणार १४ फेब्रुवारीला घरी” असं लिहलं आहे.
सध्या सर्वत्र व्हॅलेंनटाईन डेजची चर्चा सुरु आहे याच पार्श्वभूमीवर तरुणानं मनोरंजनासाठी ही पाटी झळकली.युजरने व्हिडीओ शेअर करताना “कोण कोण बसणार घरी” असं कॅप्शन लिहलं आहे. नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कमेंट केलीय, “कधी भेटेल काय माहिती” तर आणखी एकानं कमेंट केलीय, “सगळेच सिंगल आहेत वाटतं” अशी कमेंट केली आहे.