बाजार समितीमध्ये येणाऱ्या व्यापाऱ्याकडून पोलिसांची सक्तीची वसुली

0
385

माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी बाजार समिती येथे दर शनिवारी शेळ्या-मेंढ्या यांचा बाजार भरत असतो. या बाजारामध्ये इतर इतर जिल्ह्यातील व्यापारी माल खरेदीसाठी येत असतात. या व्यापाऱ्या पोलीस शहराच्या चारही बाजूला थांबत असून त्यांच्याकडून सक्तीने वसुली करत असून, सदरची वसुली बंद करावी या मागणीसाठी आटपाडी बाजार समिती येथे सभापती संतोष पुजारी बाजार समितीचे संचालक व व्यापारी यांच्यात बैठक संपन्न झाली. यावेळी पोलिसांच्याकडून होणाऱ्या त्रासाबाबत थेट जिल्हा पोलीस प्रमुख यांचाच निवेदन देण्याचे ठरले.

 

 

याबबत अधिक माहिती अशी, आटपाडीच्या आठवडा शेळी-मेंढी बाजार हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये दर शनिवारी भरला जातो. यामध्ये सांगली,सातारा सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी सिंधुदुर्ग, कराड या ठिकाणाहून सुमारे पाचशे ते सातशे चारचाकी वाहणातून मोठ्या प्रमाणात व्यापारी व शेतकरी शेळ्या मेंढ्या खरेदी करण्यासाठी येत असतात. माल खरेदी करून जाणाऱ्या व्यापाऱ्यांच्या चार चाकी वाहनाला आटपाडी शहरांमध्ये अडवून त्यांच्याकडून सक्तीने आटपाडी पोलीस ठाण्याचे काही कर्मचारी हप्ते वसूल करत असल्याचा आरोप व्यापारी व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांच्याकडून करण्यात आला.

 

 

यावेळी बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी, संचालक सुबराव पाटील, माजी उपसभापती राहुल गायकवाड, सुनील तळे, सचिव शशिकांत जाधव तर व्यापारी विशाल नलवडे, परवेझ मुल्ला, साबुद्दीन कसाई, लतीफ कसाई, काशीम मुल्ला, नजीर जमादार,असिफ खाटीक, सरदार जमादार, जुनेद कसाई उपस्थित होते.

 

 

यावेळी व्यापाऱ्यांनी पोलिसांच्या लुटीबाबत चा पाढा वाचला, दर शनिवारी आटपाडी-करगणी रोड, आटपाडी -दिघंची रोड, आटपाडी- सांगोला रोड,आटपाडी निंबवडे रोड या रोडवरती वाहतूक शाखेकडून नियुक्त असलेले दोन कर्मचारी व त्यांनी नियुक्त केलेले खाजगी चार व्यक्ती या वसूल करत दमदाटी करत असल्याचा आरोप केला. जर पैसे नाही दिले तर ऑनलाईन दंड करण्याची धमकी दिली जात असल्याचाही आरोप व्यापाऱ्यांनी केला.

 

 

ताकीद देवूनही सक्तीची वसुली

खरसुंडी येथे मागील महिन्यात भरवण्यात आलेल्या जनावरांच्या यात्रेमध्ये एका वाहनाकडून 300 ते 400 रुपये वसुली वाहतूक शाखेच्या पोलिसांनी केली आहे. याबाबत संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला चार ते पाच वेळा ताकीद देऊनही पुन्हा पुन्हा तोच प्रकार घडत आहे.

संतोष पुजारी
सभापती, बाजार समिती

 

 

खाजगी व्यक्ती गाड्या अडवून पैसे मागत असेल तर त्याची माहिती कळवावी. त्यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल केले जातील व वाहतूक शाखेकडे असणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई केली जाईल.

विनय बहिर,
पोलीस निरीक्षक आटपाडी

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here