
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असतात. त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्या एक उत्तम गायिकाही आहेत. त्यांची बरीच गाणे लोकप्रिय झाली आहेत. दरम्यान आता त्यांचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ‘मारो देव बापू सेवालाल’ असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्याला रसिकांची पसंती मिळताना दिसते आहे.
अमृता फडणवीस यांचे ‘मारो देव बापू सेवालाल’ हे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. टी-सीरीजने त्यांच्या अधिकृत युट्युब चॅनेलवर रिलीज केले आहे. या गाण्यात अमृता फडणवीस बंजारा लूकमध्ये दिसत आहेत. हे गाणे गीतकार निलेश जालमकर यांच्या लेखणीतून साकार झाले आहे. तर याचे संगीत दिग्दर्शन कामोद सुभाष यांनी केले आहे. अमृता फडणवीस यांच्या इतर गाण्यांप्रमाणेच हे गाणेही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या गाण्याला चाहत्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस बँकर असण्यासोबतच गायिका आणि सामाजिक कार्यकर्त्याही आहेत. त्या सोशल मीडियावर चांगल्याच सक्रीय असतात आणि त्याच्या आयुष्यातील अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असतात. अमृता फडणवीस यांनी यापूर्वी अनेक भक्तीपर गीते गायली आहेत. त्यांनी गायलेले ‘शिव तांडव स्तोत्र’ देखील चांगलेच लोकप्रिय झाले होते. तसेच ‘मूड बना लिया’ हे गाणेही चांगलेच व्हायरल झाले होते.