माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : खाजगी बचत गट फायनान्सच्य विरोधात आटपाडी येथील महिलांनी तहसीलदार कार्यालयसमोर आमरण उपोषण सुरु केला आहे. आर्थिक फसवणूकी बाबत गुन्हा नोंद करावा या मागणीसाठी सदरचे आमरण उपोषण स्रुरू असून उपोषणाचा काल पहिला दिवस होता.
याबाबत अधिक माहिती अशी, आटपाडी मुलाणकी येथील सलमा कमरूद्दीन मुल्ला व कमरूद्दीन आलम मुल्ला यांनी आमचा बचत गट करून ‘ग्रामीण कुट्टा, बंधन बैंक, भारत फायनान्स, चैतन्य फायनान्स’ यासारख्या फायनान्स कंपन्याकडून आमचा बचत गट तयार करून आर्थिक सक्षम व उद्योग व्यवसाय, घरगुती अडचणी सोडविण्याकरिता अल्प दराने व्याज आकारून आधिक मदत करण्याचे आश्वासन दिलेले होते.
त्याप्रमाणे महिलांनी कागदपत्रे तयार करून दिली. या कागदपत्रावर सलमा कमरूद्दीन मुल्ला या महिलेने कर्जाची उचलली. सदर प्रकरणी महिलांना कोणतीही कल्पना नव्हती. सदरची सलमा कमरूडीन मुल्ला ही महिला इतर महिलांचे पैसे परस्पर पैसे घेवून पळून गेली आहे.
सलमा कमरूडीन मुल्ला ही इतर महिलांचे पैसे घेवून पळून गेली असली तरी, खाजगी बचत गट फायनान्सचे वसुली एजंट हे सदर महिलांच्या घरी जावून त्यांना पैसे भरण्यास दमदाटी करत आहेत. त्यामुळे महिला वैतागून गेल्या असून, जर पैसेच मिळाले नाहीत तर, भरणार कोठून असा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे? त्यामुळे सलमा कमरूडीन मुल्ला व कमरूद्दीन आलम मुल्ला यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आमरण उपोषणाला बसल्या असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) महिला तालुकाध्यक्ष सुष्मिता मोटे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु आहे. आंदोलनाला आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांनी भेट दिली.
- यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
सिस्कॉम एंटरटेनमेंट अँड लीजर एलएमडी. यूके (ईऑनेट कम्युनिटी) या फायनान्स कंपनीचे स्वाती खामकर, विशाल खामकर, पंकज जगताप (कोल्हापूर), दिपक महाजन (इचलकरंजी), सलाम कमरुद्दीन मुल्ला व कमरुद्दीन मुल्ला यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनात केली आहे.
- वसुलीच्या भीतीने महिला घरी जाईनात
बचत गटाकडून घेतलेल्या कर्जाचा हप्ता वसुलीसाठी एजंट महिलांच्या घरी जात आहेत. जो पर्यंत हप्त्याचे पैसे मिळत नाहीत तो पर्यंत सदरचे वसुली एजंट घरातून जात नसल्याने महिला हवालदिल झाल्या आहेत. आंदोलनात बसलेल्या महिला लहान मुले घेवून बसल्या असून, वसुलीच्या भीतीने महिला घरी जाण्यास नकार देत आहेत.