५ जादुई घरगुती उपाय- १० मिनिटांत मिळेल आराम
1. ज्यांना नेहमीच हायपर ॲसिडीटीचा त्रास होतो त्यांनी नियमितपणे दुपारी १२ वाजेच्या आसपास नारळ पाणी प्यावे.
2.दुसरा उपाय म्हणजे जेवण झाल्यानंतर धन्याचा काढा प्यावा. यासाठी एका पातेल्यामध्ये १ ग्लास पाणी घाला आणि त्यात अर्धा चमचा धने घालून ते उकळा. हे पाणी गाळून घ्या आणि गरम प्या.
3.ॲसिडीटीचा त्रास जाणवायला लागल्यास बडिशेप चावून खावी. यामुळेही ॲसिडीटी लगेच कमी होते.
4.जर तुमच्या दोन जेवणांमध्ये खूप गॅप पडत असेल तर अशावेळी खडीसाखर चघळा. तुमच्या शरीरात जे जास्तीचं ॲसिड तयार होत आहे ते खडीसाखरेतील घटकांमुळे न्युट्रलाईज होण्यास मदत होते.
5.दररोज रात्री ७ ते ८ तासांची झोप घ्या. यामुळे शरीरात जास्त ॲसिड तयार होत नाही आणि ॲसिडीटीचा त्रास आपोआपच नियंत्रणात राहातो.