विभूतवाडीत जेसीबीने घर पाडले

0
119

माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील विभूतवाडीत येथे जेसीबीच्या सहाय्याने घर पाडल्या प्रकरणी चार आरोपी विरुद्ध आटपाडी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.

 

यातील फिर्यादी, रामचंद्र मोटे (वय-48) व्यवसाय-शिक्षक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी शंकर सोपान मोटे, भीमराव पडळकर, कमल शंकर गोरड, सुनिता भिमराव पडळकर सर्व रा. विभूतवाडी या आरोपींनी जेसीबीच्या साह्याने फिर्यादीचे व विजयकुमार रंगनाथ मोटे यांचे जुने घर पाडून नुकसान केले आहे. फिर्यादी हे घर पाडू नका म्हणून अडवायला गेले असता आरोपी कमल शंकर गोरड व आरोपी सुनिता भिमराव पडळकर यांनी फिर्यादीचे पत्नीला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे.

 

सदरची घटना दिनांक ०२ रोजी सायंकाळी 06.00 वा.चे सुमारास विभूतवाडी गावी फिर्यादीचे घरासमोर घडली. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here