माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी शहरामधील धांडोरमळा येथे रानातून जायचे नाही असे म्हणत दोघांना लोखंडी गजाने मारहाण केल्याची घटना घडली. याबाबत श्रेयश चंद्रकांत मेटकरी रा. लोणारखोरी ता.आटपाडी याने दादासाहेब काकसो पाटील, महादेव काकासो पाटील, हर्षवर्धन दादासो पाटील, काकासो देवाप्पा पाटील सर्व रा.धांडोरमळा यांच्या विरोधात आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, यातील आरोपी, दादासाहेब पाटील याने श्रेयश यास तू आमच्या रानातून जायचे नाही असे म्हणत काठीने दुसरा आरोपी महादेव पाटील याने लोखंडी गजाने मारहाण केली. यावेळी श्रेयश याचा भाऊ पृथ्वीराज भांडणे सोडवण्यास गेला असता त्यास हर्षवर्धन याने मारहाण करत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सदर घटनेची आटपाडी पोलिसात नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.