केसगळतीही थांबेल आणि कोंडाही होईल दूर, जावेद हबीबनं सांगितला एक खास हेअर मास्क!

0
105

केसगळती, कोंडा, रखरखीत होणे केसांसंबंधी अशा अनेक समस्या कॉमन झाल्या आहेत. या समस्या दूर करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात. तर काही लोक महागड्या प्रोडक्ट्सचा वापर करतात. अशात सेलिब्रिटी हेअर केअर एक्सपर्ट जावेद हबीब यानं केसांसंबंधी या समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगितले आहेत. ज्यांचा वापर करून तुम्ही केस मजबूत ठेवू शकता.

 

महत्वाची बाब म्हणजे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला जास्त खर्च करण्याची सुद्धा गरज नाही. जावेद हबीब यानं केसांसाठी खोबऱ्याचं तेल आणि आल्याचा एक खास हेअर मास्क बनवण्याचा सल्ला दिला आहे. या एका हेअर मास्कनं केसांसंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर केल्या जाऊ शकतात.

 

नॅचरल हेअर मास्क

केस मजबूत आणि सुंदर बनवण्यासाठी आले आणि खोबऱ्याच्या तेलाचा वापर करून एक हेअर मास्क तयार केला जाऊ शकततो. यासाठी एक चमचा आल्याचं पावडर घ्या आणि त्यात २ ते ३ चमचे खोबऱ्याचं तेल मिक्स करा. आता हे मिश्रण चांगल्याप्रकारे मिक्स करा. नंतर हे मिश्रण केसांना १० ते १५ मिनिटांसाठी लावून ठेवा. त्यानं साध्या पाण्यानं केस धुवून घ्या. या हेअर मास्कनं केसांना पोषण मिळतं आणि केसांची वाढही होते.

 

आले आणि खोबऱ्याचं तेल लावण्याचे फायदे

– आल्यामध्ये भरपूर पोषक तत्व असतात, ज्यामुळे डोक्यात ब्लड सर्कुलेशन चांगलं होतं. यानं केसांची वाढही होते आणि केस दाट व मजबूत होण्यास मदत मिळते.

– आल्यामध्ये अॅंेटी-फंगल गुण असतात, जे केसांमधील कोंडा दूर करण्यास मदत करतात. यामुळे डोक्याची त्वचा साफ होते आणि निरोगी राहते.

 

– आल्यांमध्ये अॅंरटी-फंगलसोबतच अॅंतटी-बॅक्टेरिअल गुणही असतात, जे डोक्याच्या त्वचेला होणारं इन्फेक्शन कमी करतात. ज्यामुळे केस हेल्दी होतात.

 

– खोबऱ्याचं तेल केसांसाठी अनेक दृष्टीनं फायदेशीर असतं. यातील अॅंलटी-ऑक्सिडेंट्स आणि अॅंयटी-मायक्रोबियल गुण केसांना आतून पोषण देतात. तसेच या तेलानं केस मुलायम आणि चमकदार होतात.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here