लग्न म्हटलं की डान्स, मज्जा मस्ती ही हमखास असते. सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. लग्नामध्ये डान्स करण्याची प्रत्येकाला हौस असते मग डान्स करता येत असो किंवा नसो. गाण्याच्या तालावर थिकरण्याची एक वेगळीच मज्जा असते. अशा एका लग्नातील व्हिडिओ चर्चेत आला आहे. व्हिडीओमध्ये एका काका आणि आजोबांनी अफलातून डान्स केला आहे. काका आणि आजोबांचा डान्स नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे.
उफ तेरी अदा या गाण्यावर एक काका उत्साहात नाचताना दिसत आहे तर झिंग झिंग झिंगाट गाण्यावर आजोबांनी झिंगाट डान्स केला आहे. आका आणि आजोबांच्या याव्हिडिओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओला तीस लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
व्हायरल व्हिडिओ एका लग्नाच्या संगीतमधील आहे. एका काका कुर्ता-पायजमा आणि स्नीकर्स घालून आत्मविश्वासाने डान्स नाचताना दिसत आहे. उफ तेरी अदा या गाण्यावर काका टुमकत आहे. गाण्याच्या तालावर काका कंबर हलवत आहे. काकांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वजण टाळ्या वाजवत आहे. काकांच्या नंतर एका आजोबाही व्हिडीओमध्ये नाचताना दिसत आहे. आजोबांनी सफारी सुट परिधान केलेला आहे. आजोबा देखील झिंग झिंग झिंगाट गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसत आहे. आजोबांचे वय झाले असूनही त्यांनी इतका चांगला डान्स केला हे पाहून नेटकरी थक्क झाले आहे.
व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “प्रत्येक लग्नात एक तरी असा नातेवाईक असतोच जो असा डान्स करतात”
व्हिडिओवर कमेंट करताना नेटकऱ्यांनी काकांचे आणि आजोबांचे कौतुक केले आहे. एकाने कमेंट केले की, मला वाटते डान्स ही फक्त भावना व्यक्त करण्याबद्दल आहे, कोणीही त्याला नाव ठेवू नये, मनापासून लोक नाचतात हे पाहायला खूप आवडते.”
दुसऱ्याने कमेंट केली की, “ज्या प्रमाणे ते डान्स एन्जॉय करत खरचं खूप भारी वाटत आहे. “
तिसऱ्याने ते अगदी अचूकपणे सांगितले: “हा आनंदाचा प्रकार आहे जो थेरपी म्हणून लिहून दिला पाहिजे.”
काहींनी काकांना “इंडियन मायकेल जॅक्सन” हा किताब दिला.