‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील या कलाकाराचा लूक इतका भन्नाट आहे की तुम्ही ओळखूच शकणार नाही

0
1430

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील ऑनस्क्रीन धमाल आपण एपिसोडमधून पाहतोच. पण कार्यक्रमातील कलाकारांचे पडद्यामागचे धमाल किस्से देखील निरनिराळ्या प्रकारे आपल्या पर्यंत पोहचतात. महाराष्ट्राची हास्यजत्राचे कलाकार प्रेक्षकांना हसवण्यासाठी बरीच मेहनत करतात. वेगवेगळी पात्र साकारून निरनिराळ्या प्रकारे आपल्या समोर साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. यातच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील एका हास्यवीराचा फोटो समोर आला आहे. या अभिनेत्याला ओळखणं कठीण झालंय.

 

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे पृथ्वीक प्रताप. आगामी एपिसोडमध्ये पृथ्वीक प्रताप हा खास लूक करुन समोर येणार आहे. येत्या भागात त्याने विशेष असे पात्र साकारण्यासाठी पृथ्वीकने हा हटके लुक केला आहे. पृथ्वीकने लूकवर घेतलेल्या मेहनती वरून आपल्याला समजत असेलच हे हास्यवीर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी स्क्रीनवर मेहनत घेतातच पण पडद्यामागे देखील तेवढीच मेहनत घेताना पाहायला मिळत आहे.

 

 

पृथ्वीकचा हा लुक करताना या कलाकारांसोबत मेकअप टीमचे देखील तितकेच कौतुक केले पाहिजे. या लूकच्या माध्यमातून पृथ्वीक कशी मेहनत करतो, याकडे सर्वांचं लक्ष आहे. सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. “महाराष्ट्राची हास्यजत्रा” हा कार्यक्रम नवे पर्व, नवे विषय, नवनवीन प्रहसने यांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन होत आहेच.