सांगलीच्या सई ताम्हणकरचा बिनधास्त अंदाज

0
12

उत्तम अभिनय आणि मेहनतीच्या जोरावर सांगलीच्या सई ताम्हणकरने सिनेइंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केलंय.

 

करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये मुंबईतील पीजीमध्ये राहण्याच्या स्ट्रगलपासून मुंबईत आलिशान घर घेण्यापर्यंतचा प्रवास सई ताम्हणकरने पूर्ण केलाय.

 

सईने नाटक, एकांकिकांमधून पुढे येत मालिकांमध्ये एन्ट्री केली आणि मालिकेतून हळूहळू रुपेरी पडद्यावरचा प्रवास सुरु केला आणि आता हा प्रवास थेट बॉलिवूडपर्यंत पोहोचलाय.
सई ताम्हणकरकडे फॅशन आयकॉन म्हणून पाहिले जाते. तिचा ड्रेसिंग सेन्स खूप चांगला आहे.

 

सई ताम्हणकर एकापेक्षा एक हटके फोटोशूट करत असते. आताही तिचे लेटेस्ट फोटोशूट चर्चेत आले आहे.
यात ती खूपच स्टनिंग दिसते आहे.सईचा हा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना खूप भावतो आहे. तिच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. सई ताम्हणकर लवकरच ‘सिक्रेट ऑफ शिलेदार्स’ वेबसीरिजमध्ये दिसणार आहे.