![Untitled](https://mandeshexpress.com/wp-content/uploads/2025/01/Untitled-15.png)
सामान्यपणे लोक रोज ३ वेळ जेवण करतात. सकाळी, दुपारी आणि रात्री. या तिन्ही जेवणाच्या वेळा आपल्या आरोग्यावर खोलवर प्रभाव करत असतात. दुपारचं जेवण आणि रात्रीच्या जेवणात योग्य अंतर ठेवलं नाही तर आरोग्यासंबंधी अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.तर मग, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण यात किती तासांचं अंतर असायला हवं?
दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण ४ ते ६ तासांचा गॅप असणं आयडिअल मानलं जातं. या अंतरानं अन्न व्यवस्थित पचन होण्यासाठी पचन तंत्राला पुरेसा वेळ मिळतो आणि मेटाबॉलिज्म सक्रिय राहतं. जर हा गॅप खूप कमी किंवा जास्त झाला तर यानं पचन आणि शरीराची एनर्जी लेव्हल प्रभावित होते.
जर लंच म्हणजे दुपारचं जेवण आणि डिनर म्हणजे रात्रीच्या जेवणात जास्त गॅप होत असेल तर पोटात अॅसिडिटी, गॅस आणि अपचन अशा समस्या होऊ शकतात. तेच, गॅप कमी ठेवला तर पचन तंत्राला अन्न पचनास पुरेसा वेळ मिळत नाही. ज्यामुळे पोटात जडपणा जाणवू शकतो आणि पोट फुगू शकतं.
दोन जेवणातील गॅपच्या चुकीच्या वेळेमुळे शरीराला एक्स्ट्रा भूक लागू शकते, ज्यामुळे लोक अनहेल्दी स्नॅक्स किंवा जंक फूड खातात. या सवयीमुळे वजन वाढण्याचा धोका सगळ्यात जास्त असतो.
लंच आणि डिनरमध्ये योग्य अंतर न ठेवल्यानं ब्लड शुगर लेव्हल असंतुलित होऊ शकते. जे डायबिटीसच्या रूग्णांसाठी घातक ठरू शकतं.
रात्रीचं जेवण फार उशीरा केल्यानं पचन क्रिया स्लो होते, ज्यामुळे झोपेची क्वालिटी बिघडू शकते. हे नेहमीच होत असेल तर तणाव आणि थकवा जाणवू शकतो.