आरोप सिद्ध झाल्यास जवळचा असो व बाहेरचा कुणालाही माफी नाही; अजित पवार म्हणाले…

0
158

माणदेश एक्सप्रेस/पुणे : संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणालाही सोडणार नसल्याचे आश्वासन दिले आहे. तसेच आरोपींवर कडक कारवाई होणार असल्याचे सांगितले आहे. पोलिसांनाही या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शासनाने बीड येथील प्रकरणाची शासनाने गंभीर दखल घेतल्याचे सांगितले आहे.

 

दौंड सोसायटीच्या उद्घाटनप्रसंगी अजित पवार म्हणाले, पोलिसांनी आदरयुक्त दबदबा निर्माण केला पाहिजे. महिलांवर अन्याय, अत्याचार करणाऱ्या नराधमांना सात जन्म आठवले, अशी कारवाई झाली पाहिजे. बीड येथील प्रकरणाची शासनाने गंभीर दखल घेतलेली आहे. या प्रकरणात कोण जवळचा आणि कोण बाहेरचा असे न करता आरोप सिद्ध झाल्यास संबंधितावर कडक कारवाई करून कुणालाही माफी मिळणार नाही.