आदित्य ठाकरेंनी तीनवेळा देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट; नेमकं कारण काय?

0
237

माणदेश एक्सप्रेस/मुंबई  : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तीनवेळा भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरी आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुका काही महिन्यात होणार असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची भेट झाली आहे. आज सकाळीच आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर आमदार आदित्य ठाकरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या. ठाकरे म्हणाले, सर्वच पोलिस कॅम्पसमध्ये दंडनीय शुल्क लावला आहे. तो शुल्क स्थगित करण्याची मागणी केली. मागच्या सरकारने यावर स्थगित देणार सांगितले होते पण त्यांनी तसे केले नाही. मुंबई पोलिसांना मुंबईतच घर मिळावेत अशी मागणी केली. तसेच आमच्या सरकारच्या काळात सर्वांसाठी पाणी ही योजना आणली होती, पण मागच्या सरकारने हे स्थगित केले. ही योजना पुन्हा एकदा सुरु करण्याची मागणी केली. याबाबत आज आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली.

 

 

“मुंबईत झालेल्या टोरेस घोटाळा झाला आहे, त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आम्ही केली. पाणी आणि पोलिसांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर पॉझिटिव्ह आहेत. आमच्या होणाऱ्या भेटीगाठी जनहीताच्या कामासाठी आहेत, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

.