माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडीच्या शनिवार बाजारामध्ये वाजंत्री लावून मिरवणुकीसाठी आणलेला बैल उधळून पाच ते सहा नागरिक जखमी झाल्याची घटना काल दिनांक ०४ रोजी दुपारच्या दरम्यान घडली. दरम्यान शेतकऱ्यांनी वेळीच त्या बैलावर अंकुश मिळवल्याने मोठा अनर्थ टळला.
आटपाडी शहराचा दर शनिवारी आठवडी बाजार भरत असतो. या दिवशी आटपाडी तालुक्यातील बहुतांश नागरिक व शेतकरी भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तू खरेदी-विक्री साठी येत असतात. यावेळी एका शेतकऱ्याने आपल्याजवळ असणारा देखणा बैल सर्व नागरिकांना व शेतकऱ्यांना माहीत व्हावा या उद्देशाने मेन व्यापारी पेठेतून मिरवणूकीने निघाला होता.
दरम्यान नगरपंचायत समोरील वाहनांची असणारी वर्दळ व जमलेल्या नागरिकांच्या गोंगाटाने बैल सैरावर झाला. परिणामी बैलावरील शेतकऱ्याची पकड ढीली झाल्याने बैल उधळला. नागरिकांच्या वर बैलाने हल्ला केला. यामुळे सुमारे सहा ते सात नागरिकांना दुखापत झाली. यामुळे याठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात धावपळ झाली. शेतकऱ्याने वेळीच आपल्या बैलावर अंकुश ठेवल्याने पुढील अनर्थ टळला. अन्यथा. बाजारामध्ये बैल शहरावर पळत सुटला असता तर अनेक नागरिक व व्यापारी जखमी होवून मोठी जीवितहानी टळली आहे.