मोठी बातमी ; 5 जणांचा मृत्यू ; हळद लागण्यापूर्वीच वऱ्हाडाची बस ताम्हिणी घाटात पलटली

0
1046

माणदेश एक्सप्रेस न्युज : माणगाव : ताम्हिणी घाटात लग्नाचे वह्राड घेऊन निघालेली खासगी बस पलटली. शुक्रवारी (दि २०) सकाळी १० वाजेच्या सुमारास हा अपघात झाला आहे. बसमधील पाच प्रवासी बसखाली सापडून दगावले आहेत.

 

मृतांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. या अपघातात एकूण 25 प्रवासी जखमी झाले असून तीन प्रवासी गंभीर जखमी असल्याचे समोर येत आहे. हे वऱ्हाड विश्रांतवाडी येथून महाड या ठिकाणी लग्नकार्यानिमित्ताने चालले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील लोहगाव येथून जाधव कुटुंब हे महाड येथील बिरवाडी येथे बसमधऊन लग्नसमारंभासाठी खासगी बसने जात होते.

 

purple ट्रॅव्हल्सची खाजगी बस (क्रमांक.MH14GU3405) ही रस्त्यावरून जात असताना ताम्हिणी घाटात वॉटरफॉल पॉईंटजवळ धोकादायक वळणावर बस ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले आणि बसचा भीषण अपघात झाला. ही गाडी पूर्णपणे पलटी झाली आणि पाच जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये 2 पुरूष आणि 3 महिलांचा समावेश आहे. संगीता धनंजय जाधव , गौरव अशोक दराडे, शिल्पा प्रदीप पवार आणि वंदना जाधव अशी मृतांची नावे असून पाचव्या मृत पुरूषाची ओळख अजून पटलेली नसल्याने त्याचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. अपघातात 27 हून अधिक लोक जखमी असून काही जण बसमध्येही अडकले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

 

पोलिसांची त्वरीत कारवाई
या अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी त्यांच्या टीमसह घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आले असून पोलीस, रेस्क्यू टीम, आणि वैद्यकीय मदत घटनास्थळी दाखल झाली आहे. जखमींवर माणगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून या अपघाताप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.