माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : खानापूर विधानसभेसाठी आज दिनांक ०४ रोजी दुपारी ३.०० पर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्यात येणार असून, आज शेवटचा दिवस आहे. महायुती कडून सुहास बाबर तर महाविकास आघाडीकडून वैभव पाटील यांचे दाखल आहेत. महाविकास आघाडी व महायुतीमध्ये दोन्ही गटाकडून बंडखोरी करण्यात झाली आहे.
महायुती कडून सांगली जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर यांनी बंडखोरी केली आहे. तर महाविकास आघाडीकडून माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख यांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी व महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या समोर बंडखोर यांनी मोठे आव्हान निर्माण केले आहे.
खानापूर विधानसभेसाठी एकूण २८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. आज अर्ज माघारी घेण्याची शेवटीची मुदत असली, तरी खरी लढत ही सुहास बाबर, वैभव पाटील, ब्रम्हानंद पडळकर, राजेंद्रआण्णा देशमुख यांच्यात होणार असून पक्षाच्या अधिकृत उमेदवारा विरुद्ध बंडखोर माघारी घेणार का? त्यांच्यापुढे आव्हान निर्माण करणार हे आज दुपारी ३.०० वा. स्पष्ट होणार आहे.