मिस युनिव्हर्स इंडिया 2024 (Miss Universe India) चा ताज गुजरातच्या रिया सिंघाने (Rhea Singha) जिंकला आहे. राजस्थानची राजधानी जयपूर येथे मिस युनिव्हर्स इंडियाचा कार्यक्रम पार पडला. बॉलिवूडची अभिनेत्री उर्वशी रौतेलाने 2024 च्या मिस युनिव्हर्स इंडियाच्या विजेता स्पर्धकाला मुकुट घातला. विशेष म्हणजे रिया सिंघाच्या या विजयामुळे ती भारताचे प्रतिनिधित्व मिस युनिव्हर्स 2024 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत करणार आहे.
रिया सिंघा कोण आहे ?
गुजरातची रहिवासी असलेली रिया सिंघा हीनं रविवारी मिस युनिव्हर्स इंडियाचा किताब जिंकला. ती आता मेक्सिकोमध्ये होणाऱ्या मिस युनिव्हरर्स २०२४ मध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. सोशल मीडियावर देखील रियाचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. जयपूर येथील कार्यक्रमात रियाने ५१ स्पर्धकांना हरवून हा ताज जिंकला आहे.
स्टेजवर रिया सिंघा भावूक
मिस युनिव्हर्स इंडिया २०२४ चे विजेतेपद जिंकल्यानंतर रिया भावूक झाली आणि म्हणली, आज विजेतेपद जिंकल्यानतंर मी खूप आभारी आहे. हा ताज जिंकण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे. मागील विजेत्यांकडून मी खूप प्रेरित असल्याचे तीनं सांगितले.
प्रांजल प्रिया हीला प्रथम उपविजेतेपदाचा मुकुट देण्यात आले, तर छवी हीनं द्वितीय विजेतेपद पटकावले आणि तर सुष्मिता रॉय ही तिसरी उपविजेता ठरली. स्पर्धेमध्ये स्विमसूट आणि इव्हनिंग गाऊन अश्या विविध फेऱ्यांचा समावेश होता आणि कार्यक्रमाचा समारोप करताना टॉप १० अंतिम स्पर्धकांसाठी प्रश्न उत्तर सत्र घेण्यात आले होते.
पहा पोस्ट:
instagram.com/reel/DAPUkX3N_K8