महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून बारावी च्या निकालानंतर आता दहावीचा निकाल (SSC Result) कधी जाहीर होणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. अशामध्ये आता आज 24 मे पासून अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरू होत आहे. ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरले जात असल्याने आजपासून विद्यार्थ्यांना भाग एक भरता येणार आहे. https://11thadmission.org.in/ या पोर्टलवर ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रात केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. नक्की वाचा: 11th Admission Process Dates: दहावीच्या निकालापूर्वी 11वी प्रवेश प्रक्रियेसाठी तारखा जाहीर; 24 मे पासून भरता येणार भाग 1!
अर्ज भाग 1 कसा भरायचा?
11thadmission.org.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन नोंदणी करून लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार करा.
लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करून इयत्ता 11वी प्रवेशासाठी अर्जाचा भाग 1 भरा.
ऑनलाईन शुल्क भरून फॉर्म लॉक करा.
अर्ज प्रमाणित करण्यासाठी मार्गदर्शन केंद्र निवडा.
मार्गदर्शन केंद्र किंवा माध्यमिक शाळांमध्ये जाऊन विद्यार्थी आपला अर्ज प्रमाणित करून घेऊ शकतात.
यंदा दहावीचा निकाल कधी?
बारावीचा निकाल 21 मे दिवशी जाहीर केल्यानंतर बोर्डाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांमध्येही त्यांच्या बोर्ड निकालाची उत्सुकता वाढली आहे. रिपोर्ट्सनुसार यंदा 10वी, 12वी चे निकाल मे महिन्यातच जाहीर होणार आहेत त्यामुळे आता मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. बोर्डाकडून निकालाच्या केवळ 1 दिवस आधी तारीख जाहीर होत असल्याने विद्यार्थ्यांची उत्सुकता आता वाढली आहे.
सध्या फॉर्मचा केवळ पार्ट 1 भरला जाणार आहे. बोर्डाकडून निकाल जाहीर झाल्यानंतर पार्ट 2 भरला जातो ज्यामध्ये कॉलेजच्या प्राधान्यक्रमांचा विचार केला जातो.