आयकर विभागानं जारी केलेल्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

0
4604

आयकर विभागानं (Income Tax Department) तामिळनाडू आणि पुद्दुचेरीसाठी मोठी संधी उपलब्ध करून देत भरती जाहीर केली आहे. तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी असू शकते. आयकर विभागानं गट ‘C’ कॅडर अंतर्गत कॅन्टीन अटेंडन्ट पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवार tincometax.gov.in वर जाऊन या पदांसाठी अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे आणि उमेदवारांनी 22 सप्टेंबर 2024 रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज करणं आवश्यक आहे.

आयकर विभाग या प्रक्रियेतंर्गत एकूण 25 पदं भरणार आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांनी, सर्वात आधी सर्व गाईडलाईन्स आणि पात्रतेच्या अटी काळजीपूर्व वाचाव्यात.

Income Tax Recruitment 2024: भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता
आयकर विभागातील भरती 2024 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मॅट्रिकचं प्रमाणपत्र (दहावी) किंवा मान्यताप्राप्त मंडळाकडून त्यांच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा काय असेल?
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान असावं. ही वयोमर्यादा 22 सप्टेंबर 2024 पर्यंत लागू असेल. सरकारी नियमांनुसार, वयात सवलत दिली जाईल.

वेतनश्रेणी काय असेल?
निवडलेल्या उमेदवारांना 18 हजार रुपये ते 56 हजार 900 रुपये प्रति महिना पगार मिळेल, जो सरकारी वेतनश्रेणीनुसार दिला जाईल.

निवड कशी केली जाईल?
आयकर विभागाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या नोटीफिकेशननुसार, या भरतीसाठी निवड लेखी परीक्षेच्या आधारे केली जाईल. उमेदवारांच्या कामगिरीनुसार अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल.

अर्ज कसा कराल?
इच्छुक उमेदवार आयकर विभागाची अधिकृत वेबसाईट tnincometax.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारानं सर्व आवश्यक कागदपत्र स्कॅन करून ठेवावीत. या अभियानांतर्गत अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2024 आहे. अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाईटची मदत घेऊ शकतात.

अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच ‘एबीपी माझा’ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुणांपर्यंत सरकारी नोकरीच्या भरतीची माहिती दिली जाते. संबंधित संकेतस्थळाला भेट देऊन पात्र उमेदवार नोकरीसाठी अर्ज करु शकतील.