बिग बॉस मराठीच्या घरात नियमभंग केल्यामुळे आर्या जाधवला घराबाहेर काढण्यात आलं आहे. कॅप्टन्सी टास्कदरम्यान आर्याने रागाच्या भरात निक्कीच्या थोबाडीत मारली. यामुळे बिग बॉस मराठीच्या घरात हिंसा केल्यामुळे आर्याला भाऊच्या धक्क्यावर बिग बॉसने घराबाहेर काढण्याचा निर्णय दिला. आर्याला घराबाहेर काढण्याचा निर्णय प्रेक्षकांना अमान्य आहे. बिग बॉसच्या घरात आर्याने नियमभंग केला असला, तरी नेटकरी आर्याच्या पाठिशी उभं असल्याचं दिसत आहे.
आर्याला घराबाहेर काढण्याचा निर्णय प्रेक्षकांना अमान्य
बिग बॉस मराठीने आर्या जाधवला घराबाहेर काढल्याच्या निर्णयाचा प्रेक्षकांकडून विरोध करण्यात येत आहे. बिग बॉसनं दिलेला निर्णय चुकीचा असून आर्याने निक्कीला कानाखाली दिल्याचं काही नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे. इतकंच काय तर फक्त एक कानाखाली मारली त्याऐवजी आणखी मारलं पाहिजे होतं, असंही काही नेटकरी म्हणत आहेत. दरम्यान, काही नेटकऱ्यांनी निक्कीला सपोर्ट करत आर्याचा राग आणि हिंसेचा निषेध करत निक्कीला न्याय मिळाल्याचं म्हटलंय.
नेटकऱ्यांचा आर्याला फुल्ल पाठिंबा
नेटकऱ्यांनी कमेंट करत म्हटलंय, “आर्याने जे केलं ते 100% बरोबरच केलं, कोणीतरी निक्कीचं थोबाड फोडण गरजेचं होतं. अख्खा महाराष्ट्र आर्यासोबत आहे.”, “आर्याने चूक केली परत 2 हाणायला पाहिजे होत्या”. “निक्की सगळ्यांची अक्कल काढते तेव्हा कुठे असतात बिग बॉस तेव्हा का तिला काही बोलत नाही.”, “निक्कीने काय पण केले तर चालतंय पण तेचं दुसऱ्यांनी केल्यावर चालतं नाही. आतापर्यंत निक्कीने काय-काय नियम मोडलेत तरी तिला काय शिक्षा नाही.”, “आर्याला शिक्षा झाली, तर अरबाज आणि निक्की पण हायला पाहिजे”, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कमेंट नेटकऱ्यांनी दिल्या आहे.
“मी बिग बॉस बघणं बंद केलं”
याशिवाय आर्याला घराबाहेर केल्यानंतर बिग बॉस मराठी शो पाहणार नाही, असंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये म्हटलंय, “आर्याला जर बाहेर काढलं तर आम्ही बिग बॉस पाहणार नाही, बिग बॉसनेही गोष्ट ध्यानात ठेवावी”. दुसऱ्याने लिहिलंय, “बंद करा शो बघायचा, निक्कीचा बिग बॉस चालू आहे”. तिसऱ्याने लिहिलंय, “मी बिग बॉस बघणं बंद केलं”. आणखी एकाने लिहिलंय, “बाय-बाय निक्की तांबोळीचा बिग बॉस”, अशा प्रकारे कमेंट करत नेटकरी तीव्र रोष व्यक्त करत आहेत.