हैद्राबाद येथील माधापूर परिसरात एक भीषण अपघात घडला. या अपघातात २५ वर्षीय तरुणीने जीव गमावला आहे. शनिवारी सरकारी आरटीसी बसने रस्ता ओलांडणाऱ्या तरुणीला धडक दिली. या धडकेत तीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माधापूर परिसरातील कोठागुडा सर्कल या परिसरात हा अपघात घडला. एका सरकारी आरटीसी बसने रस्ता ओलांडणाऱ्या तरुणीला धडक दिली. तरुणी रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना दुसऱ्या दिशेने बस भरधाव वेगात येत होते. बस थेट तरुणीला धडकली. ही भीषण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला. मधापूर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पहा व्हिडीओ:
హైదరాబాద్ కొత్తగుడా నిన్నరాత్రి ఎలక్ట్రికల్ బస్సు ఢీకొవడంతో యువతి మృతి.. pic.twitter.com/txIuLNYpL1
— Journalist Ramesh@Etvofficial (@badarameshkumar) September 14, 2024