नवी मुंबई जवळील रोहा येथील केमिकल फॅक्टरित स्फोट झाल्याने तीन मजुरांचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी घडली. या घटनेत आणखी तीन जण जखमी झाले. या घटनेची तात्कळ माहिती पोलिसांना देण्यात आली. केमिकल फॅक्टरीच्या मिथेनॉल टाकीमध्ये फॅब्रिकेशन आणि वेल्डिंगच्या कामामुळे हा स्फोट झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ११.१५ वाजता धाटाऊ येथील साधना नायट्रो केम लिमिटेडच्या शेजारील कारखान्यात हा स्फोट झाला. स्फोटामुळे भीषण आग लागली. आग लागताच, अग्निशमन दलाला देण्यात आली. काही कामगार टाकीच्या वरच्या बाजूला काम करत होते. कंपनीने मिथेनॉल टाकीच्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. टाकी रिकामी होती पण टाकीमध्ये काही अवशेष उरले होते. टाकीच्या वरच्या भागाचे वेल्डिंगचे काम सुरु असताना ठिणग्यां टाकीत पडल्या. त्यामुळे स्फोट झाला अशा संशय अग्निशमन अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे.
दिनेश कुमार (३२), सुरजित कुमार (२१) आणि बोक्षी यादव (४५) अशी मृत झालेल्या तिघांची नावे आहेत, तर नीलेश भगत (३५), अनिल मिश्रा (४५) आणि सत्येंद्र यादव (४०) अशी उपचार सुरू असलेल्या तिघांची नावे आहेत. घटनेची तात्काळ माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे. स्फोट झाल्यानंतर कामागारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेनंतर अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी आल्या. अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.