आशियातील सर्वात शक्तिशाली वादळ म्हणून ओळखले जाणारे यागी वादळ(Typhoon Yagi) शनिवारी व्हिएतनामच्या (Vietnam)ईशान्य किनारपट्टीवर धडकले. यामुळे देशाच्या अनेक भागांमध्ये वीज पुरवठा आणि दूरसंचार विस्कळीत झाला आहे, त्याशिवाय वादळामुळे भूस्खलन होऊन 35 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 24 जण बेपत्ता आहेत. मुख्यतः वादळामुळे भूस्खलन झाले. काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. व्हिएतनामच्या आपत्ती व्यवस्थापन संस्थेने तेथील परिस्थीतीची माहिती दिली.
लाखो घरांचे नुकसान झाले आहे. वीज पुरवठा खंडित झाला, महामार्गांना नद्यांचे स्वरूप आले आहे, अनेक पूल पाण्याखाली गेलेत. हजारो झाडे कोसळून पडली आहेत. या वादळामुळे दक्षिण कोरियाची कंपनी LG Electronics च्या एका कारखान्याची भिंती कोसळली. सुदैवाने त्यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र, अनेक उपकरणे, जसे की रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशीनसह गोदामात असलेल्या वस्तूंचे पूरीमुळे मोठे नुकसान झाले आहे.
व्हिएतनाममधील दक्षिण कोरियाच्या व्यवसाय संघटनेचे अध्यक्ष हाँग सन यांनी किनारी भागातील कारखान्यांवर झालेल्या वादळी वाऱ्याच्या परिणामाबद्दल विचारले असता, “खूप नुकसान झाले आहे.” अशी प्रतिक्रीया दिली. त्याशिलाय, फु थो प्रांतातील एक पूल सोमवारी कोसळल्याची घटना घडली. दरम्यान, हवामान विभागाने आणखी काही तास धोक्याचा इशारा आहे. पूर आणि भूस्खलनाचा इशारा दिला असून, गेल्या 24 तासांत उत्तरेकडील अनेक भागांमध्ये 208 मिलिमीटर आणि 433 मिलिमीटर (8.2 इंच ते 17.1 इंच) पावसाचे नोंद झाली आहे.