पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारताने आणखी एक दुहेरी पोडियम फिनिश गाठले. पुरुषांच्या भालाफेक F46 स्पर्धेत अजित सिंग आणि सुंदर सिंग गुर्जर यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक जिंकले. अजित सिंगने 65.62 मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नाने रौप्य पदक जिंकले. तर सुंदर सिंग गुर्जर याने 64.96 मीटर फेक करून कांस्यपदक जिंकले. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताची आता 20 पदके आहेत आणि पॅरालिम्पिक खेळांमधील ही देशाची आतापर्यंतची सर्वोत्तम पदकतालिका आहे. शरद कुमार आणि मरियप्पन थंगावेलू यांनी पुरुषांच्या उंच उडी T63 स्पर्धेत रौप्य आणि कांस्यपदक जिंकल्यानंतर पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारताची ही दुसरी दुहेरी पोडियम फिनिश होती.
पाहा पोस्ट –
DOUBLE MEDALS IN MEN'S JAVELIN THROW F46
🥈 – Ajeet Singh
🥉 – Sundar Singh GurjarWELL DONE BOYS……!!!! 🇮🇳♥️ pic.twitter.com/Oz6IxI2p5s
— The Khel India (@TheKhelIndia) September 3, 2024