काय सांगता?आता तुम्हाला कार प्लेटचा नंबर ‘0001’ हवा असेल तर मोजावे लागतील तब्बल ‘इतके’ पैसे

0
335

नवी कार खरेदी केल्यावर प्रत्येकाला VIP नंबर प्लेट (VIP Number Plate)त्याच्या कारवर असावी असे वाटते. काही हौशी लोक त्यासाठी मोठी रक्कमही भरायला तयार असतात. त्यातच आता महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government)नवीन वाहनांसाठी व्हीआयपी क्रमांक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘चॉइस नंबर’ च्या शुल्कात (VIP Number Fees)मोठी वाढ केली आहे. ही वाढ मुंबई, पुण्यासह इतर जास्त मागणी असलेल्या शहरांमध्ये चारचाकी वाहनांसाठी करण्यात आली आहे. सर्वाधिक लोकप्रिय ‘0001’ क्रमांकाची नंबर प्लेटसाठी 6 लाख रुपये भरावे लागणार आहेत. परिवहन विभागाने 30 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

नवीन शुल्क वाढीचा त्याचा परिणाम

हे नवीन शुल्क जुन्या शुल्कापेक्षा खूप जास्त आहे. यापूर्वी चारचाकी वाहनांसाठी ‘0001’ क्रमांकाचे शुल्क 3 लाख रुपये होते, ते आता ६ लाख रुपये झाले आहे. त्याचप्रमाणे दुचाकी आणि तीन चाकी वाहनांसाठी हे शुल्क सध्याच्या 50,000 रुपयांवरून 1 लाख रुपयांपर्यंत वाढणार आहे. विशेषत: मुंबई, पुणे, ठाणे, औरंगाबाद, नाशिक आणि कोल्हापूर यासारख्या जास्त मागणी असलेल्या भागात दुचाकी आणि त्याहून अधिक चाकांच्या वाहनांसाठी ‘0001’ शुल्क आता 6 लाख रुपये असेल, ज्याचे शुल्क पूर्वी ३ लाख रुपये होते.

व्हीआयपी क्रमांकाच्या मागणीच वाढ

या फी वाढीमुळे, जर एखाद्या वाहन मालकाला त्याच्या वाहनासाठी ‘0001’ मालिकेतून क्रमांक घ्यायचा असेल तर त्याला त्यासाठी 18 लाख रुपये द्यावे लागतील. ही किंमत अर्थातच खूप जास्त आहे. व्हीआयपी क्रमांकांची वाढती मागणी लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने ही वाढ लागू केली आहे. मोठे उद्योगपती, राजकारणी आणि सेलिब्रिटींमध्ये या क्रमांकांची लोकप्रियता जास्त आहे. त्यांच्या महागड्या आणि आलिशान गाड्यांसाठी हे क्रमांक आकर्षक ठरतात.

महाराष्ट्र सरकारने प्रत्येक नोंदणी मालिकेत 240 VIP क्रमांक ओळखले आहेत, ज्यात ‘0009’, ‘0099’, ‘0999’, ‘9999’, आणि ‘0786’ सारख्या महत्त्वाच्या क्रमांकांचा समावेश आहे. चार आणि त्याहून अधिक चाके असलेल्या वाहनांसाठी या क्रमांकांचे शुल्कही दीड लाखांवरून अडीच लाख रुपये करण्यात आले आहे. त्याचबरोबर दुचाकी आणि तीनचाकी वाहनांसाठी हे शुल्क 20,000 रुपयांवरून 50,000 रुपयांपर्यंत वाढले आहे.

इतर लोकप्रिय क्रमांकांसाठीही शुल्क वाढवण्यात आले आहे. 16 लोकप्रिय क्रमांकांचे नवीन शुल्क चारचाकी वाहनांसाठी 70,000 रुपयांवरून 1 लाख रुपये आणि दुचाकींसाठी 15,000 रुपयांवरून 25,000 रुपयांपर्यंत वाढले आहे. याव्यतिरिक्त, 49 इतर क्रमांकांसाठी शुल्क देखील 50,000 वरून 70,000 रुपये आणि दुचाकी आणि तीन चाकी वाहनांसाठी 15,000 रुपये करण्यात आले आहे. या शुल्क वाढीमुळे राज्य परिवहन विभागाला अतिरिक्त महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. 2017-18 या आर्थिक वर्षात, नोंदणी क्रमांक जारी करण्याच्या 1,83,794 प्रकरणांमधून विभागाला 139.20 कोटी रुपये मिळाले होते.

189 अन्य नोंदणी क्रमांकांसाठी, जसे की ‘0011’, ‘0022’, ‘0088’, ‘0200’, ‘0202’, ‘4242’, ‘5656’, आणि ‘7374’, चारचाकी वाहनांसाठी सुधारित शुल्क 25,000 रुपये आहे. तर, दुचाकीसाठी 6,000 रुपये असेल. याव्यतिरिक्त, राज्य सरकारने पती/पत्नी, मुलगा आणि मुलगी यासारख्या कुटुंबातील जवळच्या सदस्यांना व्हीआयपी क्रमांक हस्तांतरित करण्याची परवानगी दिली आहे. यापूर्वी या प्रकारच्या हस्तांतरणास बंदी होती.