Pune hit and run case : विशाल अग्रवालला “एवढ्या” दिवसांची पोलीस कोठडी ; तर बालहक्क न्यायालयाने मुलाचा जमीन फेटाळला

0
7

पुणे हिट अँड रन प्रकरणामध्ये आरोपी वेदांत अग्रवाल याचे वडील विशाल अग्रवाल यांच्यासह तिघांना 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी आज सत्र न्यायालायत सुनावणी पार पडली. यावेळी पुणे पोलिसांकडून युक्तिवाद करण्यात आला. सरकारी वकिलांनी विशाल अग्रवाल यांच्यासह तीन आरोपींची 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी केली होती.

 

कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर विशाल अग्रवालसह तिघांना 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. विशाल अग्रवाल यांच्यसह बार चालक जितेश शेवनी आणि जयेश बोनकर या दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या अपघातातील अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करण्यात आला असून त्याला आता बालसुधारगृहात राहावं लागणार आहे. दारू पिऊन नशेमध्ये भरधाव वेगाने गाडी चालवत या अल्पवयीन आरोपीने दोघांचा जीव घेतला होता. त्यानंतर त्याला जामीन मंजूर करण्यात आला होता. आता बाल न्याय मंडळाने त्याचा जामीन रद्द केला आहे. अल्पवयीन आरोपी हा सज्ञान आहे की नाही हे पोलिस ठरवतील असंही बाल न्याय मंडळाने म्हटलं आहे.

 

दारूच्या नशेत भरधाव गाडी चालवत दोघांचा जीव घेतल्यानंतर अवघ्या 15 तासांमध्येच त्या अल्पवयीन आरोपीला जामीन मिळाला होता. त्यामुळे नागरिकांतून एक प्रकारची नाराजी व्यक्त करण्यात येत होती. पोलिसांनी त्याच्यावर पुन्हा नवीन कलम लावलं आणि त्याचा जामीन रद्द करावा अशी मागणी केली होती. त्यानंतर आता बाल न्याय मंडळाने त्याचा जामीन रद्द केला.