मुंबईत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या (Dengue Cases Mumbai) वाढत असताना, उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी सोशल मीडियावर एक नवीन उपाय सुचवला आहे. आपल्या नाविन्यपूर्ण विचारसरणी आणि सोशल मीडियाच्या व्यग्रतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या महिंद्राने एक अद्वितीय डास मारणारे उपकरण (Mosquito Control Device) दाखवणारा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्याला त्यांनी सोशल मीडियावर “तुमच्या घरासाठी लोखंडी तोफ” असे नामोल्लेखीत करत संबोधले आहे. चिनी अभियंत्याने शोधून काढलेले हे उपकरण, लेसरवर चालणारी सूक्ष्म तोफ आहे. ज्याने डास शोधून काढण्याच्या क्षमतेकडे लक्ष वेधले आहे.
डास निर्मुलनासाठी Laser Technology
आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये हे डास मारण्याचे कथीत उपकरण पाहायला मिळते. सांगितले जात आहे की, हे उपकरण डास मारण्यासाठी वापरले जाते. डासांचा सामना करण्यासाठी जणू हे एक प्रकारचे क्षेपणास्त्रच आहे. डासांची ओळख पटवणारी रडार प्रणाली आणि त्यांना लक्ष्य करून त्यांचा नाश करणारे लेझर पॉइंटर या उपकरणाने अलिकडच्या काही महिन्यांत व्हायरल लोकप्रियता मिळवली आहे. आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या सोशल मीडिया पोस्टने वापरकर्ते आणि नेटीझन्सचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “मुंबईत डेंग्यू वाढत असताना, एका चिनी माणसाने शोधून काढलेली ही सूक्ष्म तोफ मी कशी मिळवायची? हे शोधण्याचा प्रयत्न करीत आहे, जी डास शोधून नष्ट करू शकते! हा तुमच्या घरासाठीही एक चांगली घुमट आहे.”
आनंद महिंद्रा यांच्यामुळे उपकरण पुन्हा चर्चेत
मागील वर्षी डिसेंबरमध्ये चीनी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म Weibo वर शेअर केलेला व्हिडिओ, महिंद्राच्या एक्स पोस्टनंतर सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत आला आहे. ब्राझिलियन ऑनलाइन वृत्तपत्र मेट्रोपोल्सच्या वृत्तानुसार, हे उपकरण एका चीनी अभियंत्याने तयार केले आहे. ज्याने डास शोधण्यासाठी इलेक्ट्रिक कारच्या रडारमध्ये बदल केले. उच्च-शक्तीचे लेसर पॉइंटर जोडून, अभियंत्याने अचूकपणे कीटक नष्ट करण्यास सक्षम अशी प्रणाली यशस्वीरित्या विकसित केली. उल्लेखनीय म्हणजे, अभियंता त्याच्या शोधामुळे नष्ट झालेल्या डासांच्या संख्येचे दस्तऐवजीकरण करणारी “डेथ नोट” देखील ठेवत आहे.
मुंबईत डासांमुळे होणाऱ्या आजारांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने ही चर्चा अत्यंत महत्त्वाच्या काळात होत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने मागील जून आणि जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्टच्या पहिल्या दोन आठवड्यात डेंग्यू, चिकनगुनिया आणि लेप्टोस्पायरोसिसच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ नोंदवली आहे. डास हे विविध कारणांचे मूळ ठरतात. खासकरुन डासामुळे डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया, हिवताप यांसारखे आजार होतात. या आजाराची लक्षणे किरकोळ ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी यांसारखी असली तरी, पुढे त्याचे रुपांतर मोठ्या आजारात होते. त्यामुळे नागरिकांनीही या आजाराची लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला शक्य तितक्या लवकर घेणे केव्हाही चांगले.
पहा व्हिडीओ:
With dengue on the rise in Mumbai, I’m trying to figure out how to acquire this miniature cannon, invented by a Chinese man, which can seek out & destroy mosquitoes!
An Iron Dome for your Home…
— anand mahindra (@anandmahindra) August 24, 2024