मधील सावित्री नदीमध्ये पोहायला गेलेल्या तीन जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. रायगडमध्ये हे तिघे दर्गाच्या ठिकाणी दर्शनाला आले होते, यावेळी ते पोहायला सावित्री नदीपात्रात उतरले, पण माघारी परतले नाही. बचाव पथकाने त्यांचा शोध घेतला त्यांना त्यांचे मृतदेह मिळाले. या दुर्दैवी घटनेमुळे रायगडमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सावित्री नदी किनारी सव गावातील दर्गाच्या ठिकाणी तीन जण दर्शनासाठी आले होते, त्यावेळी ते पोहायला उतरले अन् बुडून मृत्यू झालाय, अशी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली.
हे सर्व राहणारे महाबळेश्वर येथील आहेत. या तीन तरुणाची नावे दिलावर शहाबुद्दीन नालबंद, मुन्नवर शहाबुद्दीन नालबंद आणि जाहिद अशी आहेत. आज सकाळी हे तिघेजण महाबळेश्वर गवळी मोहल्ला येथून सव येथील दर्गात दर्शनाला आले होते. दर्शन घेतल्यानंतर ते पोहण्यासाठी सावित्री नदीपात्रात उतरले. अचानक पाहण्याचा प्रवाह वेगवान झाला. त्यामध्ये तिघेही बुडाली. याबाबतची माहिती बचाव पथकाला दिली. त्यांनी तिघांचा शोध घेतला, दोन तास शोध घेतल्यानंतरही एकालाही वाचवण्यात यश आले नाही.
सावित्री नदीत बुडालेल्या तरुणांच्या मृतदेहाला पोस्टमार्टमसाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. पोलिस याप्रकरणाचा पुढील तपास करत आहे. महाबळेश्वर येथील गवळी मोहल्ला गावावर शोककळा पसरली आहे. रायगडमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येते.