‘त्यांनी कारण नसताना माझं नाव  का घेतलं?’, शरद पवार यांचा राज ठाकरेंना खोचक सवाल

0
369

 

राज ठाकरेंनी कारण नसताना माझं नाव का घेतलं?; “शरद पवारांचे राजकारण हे जातीमध्ये द्वेष पसरून करणे हेच आहे. निवडणुका येतील जातील यांच्या नादी लागू नका”, असेही राज ठाकरे म्हणाले. यानतंर आता शरद पवारांनी यावर प्रत्युत्तर दिले आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी सध्या मनसेने आक्रमक पावित्रा घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठवाडा दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे नेते शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. मनोज जरांगे यांच्या आडून उद्धव ठाकरे आणि शरद पवार राज्यातील वातावरण दूषित करताय, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. “शरद पवारांचे राजकारण हे जातीमध्ये द्वेष पसरून करणे हेच आहे. निवडणुका येतील जातील यांच्या नादी लागू नका”, असेही राज ठाकरे म्हणाले. यानतंर आता शरद पवारांनी यावर प्रत्युत्तर दिले आहे.

मराठा आंदोलक रमेश केरे पाटील यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षणावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी राज ठाकरेंवरही भाष्य केले. मी या रस्त्याने जात नाही. मला महाराष्ट्र ओळखतो. माझी पार्श्वभूमी अशी नाही, असे शरद पवार म्हणाले.

शरद पवार काय म्हणाले?
“राज ठाकरे यांनी दोन तीनदा माझं नाव का घेतलं. मला कळलं नाही. मी या रस्त्याने जात नाही. मला महाराष्ट्र ओळखतो. माझी पार्श्वभूमी अशी नाही. आग्रह केला नाही. करणार नाही. मणिपूरबाबतचा प्रश्न वेगळा होता. हातभर लावण्याचा काम करतोय की आता जे बोललो ते सोडवण्याचं काम करतोय. त्यांनी कारण नसताना माझं नाव घेतलं. मीही मराठवाड्यात फिरतो. मलाही लोकांनी अडवलं. मला निवेदन दिलं. हे पवारच करतात का?” असा प्रश्न शरद पवारांनी उपस्थित केला.

राज ठाकरे काय म्हणाले होते?
राज ठाकरेंनी मराठवाडा दौऱ्यादरम्यान पत्रकारांशी संवाद साधला. माझा आणि मनोज जरांगेचा संबंध नाही. पण उद्धव ठाकरे आणि शरद पवार जरांगेच्या अडून राजकारण करत आहेत. जरांगे पाटलांच्या अडून विधानसभेचे राजकारण सुरू आहे. तुमचे राजकारण तुम्हाला लखलाभ… माझ्या नादी लागू नका… माझी पोर काय करतील हे सांगता येत नाही. उद्या माझे मोहळ उठले तर एकही सभा घेता येणार नाही. माझ्या वाट्याला जाऊ नका. तुमच्याकडे प्रस्थापित आहेत माझ्याकडे विस्थापीत आहेत, असे राज ठाकरे म्हणाले.

मनोज जरांगे पाटलांच्या अडून विधानसभेचे राजकारण सुरू आहे. शरद पवारांसारखा व्यक्ती मणिपूर होईल, असे वक्तव्य करत आहे. शरद पवारांसारखा महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती आहे. त्यांनी पुढे येऊन हे सगळे थांबवले पाहिजे तर तेच म्हणतात, महाराष्ट्राचा मणिपूर होईल. शरद पवारांनी भूमिका घेतली पाहिजे तर तेच हातभार लावत आहे. शरद पवारांचे राजकारण हे जातीमध्ये द्वेष पसरून करणे हेच आहे. निवडणुका येतील जातील यांच्या नादी लागू नका, असा सल्लाही राज ठाकरेंनी दिला होता. त्यावर आता शरद पवारांनी भाष्य केले.