केरळ येथील वायनाड जिल्ह्यातील काहा गावांमध्ये भुस्खलन झाले होते.भूस्खलन चुरमाला, मुंडक्काई, मेपपाडा, अट्टामाला, कुन्होम आणि पुनचिरीमट्टम गावात झाले. भुस्खलनामुळे अनेक लोक दगावले. लाखो कुटुंबाचे घर उध्वस्त झाले. २०० हून अधिक लोक मरण पावले तर अनेक जण जखमी झाले. भूस्खलन हे नैसर्गिक आपत्तींपैक सर्वात भयंकर मानले जाते. केरळच्या या घटनेनंतर अनेक कलाकारांनी पुढे येऊन योगदान दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तेलगु चित्रपटातील लोकप्रिय अभिनेता धानुष यांनी सीएम रिलीफ फंडात २५ लाख रुपये दि ले आहे. यांच्या योगदानाचे सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे. आता पर्यंत अनेकांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांना निधी दिला आहे. दरम्यान काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यासोबत भूस्खलन ग्रस्तांना भेट दिली.
चित्रपट निर्माते आणि अभिनेते सुब्रमण्यम सिवा यांनी त्यांच्या अधिकृत X अकाऊंटवर या घटनेची माहिती दिली. पोस्ट शेअर करताना लिहिले की, आमचा प्रिय धनुषने वायनाड पूरग्रस्तांसाठी मदत केली आहे. धनुषने मदत कार्यासाठी 25 लाख रुपयांचे योगदान दिले आहे.
या पूर्वी अल्लू अर्जुनने वायनाड भूस्खलनग्रस्तांच्या मदतीसाठी 25 लाख रुपयांची देणगी देखील दिली होती. त्यानंतर चिरंजीवी आणि त्यांचा मुलगा राम चरण यांनीही मदतीचा हात पुढे केला. दोघांन्ही मिळून केरळच्या सीएम रिलीफ फंडाच 1 कोटी रुपयांची मदत केली होती.