डान्स करत असताना अचानक ह्रदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू, घटना कॅमेऱ्यात कैद (Watch Video)

0
477

कौटुंबित कार्यक्रमात नाचताना एका तरुणाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना राजस्थान येथील भैंसलाना गावात घडली. मन्ना लाल जाखड असं मृताचे नाव आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मन्ना हे कार्यक्रमात नाचताना दिसत आहे. अचानक नाचता, नाचता ते जमिनीवर कोसळले. कुटुंबियांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. डॉक्टरांनी त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले. या घटनेनंतर कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. मन्ना हे जोधपूर येथील सराकरी शाळेत शिक्षक म्हणून कामाला होते. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

पहा व्हिडीओ:

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here