केदारनाथ यात्रेला गेलेले हजारो भाविक अडकले, महाड तालुक्यातील दहा भाविकांचा देखील समावेश

0
233

राज्यासह देशातील बहुतांश भागत मुसळधार पावसाने (Heavy Rain) एकच दाणादाण उडवली आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच उत्तराखंड (Uttarakhand) मध्ये मागील दोन दिवसापासून ढगफुटी सदृश्य पाऊस सूरु आहे. यात महाराष्ट्रासह इतर राज्यातून केदारनाथ यात्रेला (Heavy Rain in Kedarnath) गेलेले हजारो भाविक अडकुन पडले आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील देखील दहा भाविकांचा देखील समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे. यामधून आठ जणांना हेलिकॉप्टरने बाहेर काढण्यात यश आलंय. तर दोन जण अजूनही अडकून पडल्याची माहिती पुढे आली आहे. सध्या अडकून पडलेल्या भाविकांना हेलिकॉप्टरच्या सहाय्याने बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचेही बोलले जात आहे.

हेलिकॉप्टरच्या सहाय्याने बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर
केदारनाथ यात्रेला सुरुवात झाल्यापासून देशभरातून लाखों भाविक यात्रेसाठी उत्तराखंडकडे रवाना झाले आहेत. मात्र अलिकडे झालेल्या मुसळधार पावसाने मोठे अक्राळ विक्राळ रूप धारण करत मोठे नुकसान केले आहे. अशात केदारनाथ मंदीरापर्यंत जाणारा मुख्य रस्ता ठिकठिकाणी बंद पडला आहे. तर अनेक ठिकाणी दरडी देखील कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. अशातच या पूर सदृश्य पावसात रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील दहा भाविक देखील अडकून पडल्याची माहिती पुढे आली आहे. त्यातील आठ जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. तर दोन जण अद्याप अडकून पडल्याची माहिती पुढे आली आहे. बाहेर काढण्यात आलेल्यांना हरिद्वार येथे एका सुरक्षित हॉटेल मध्ये ठेवण्यात आलय. तर उर्वरित दोघेजण हे केदारनाथ परिसरातील टेकडीवरील हेलिपॅड वरच अद्याप अडकून पडल्याची माहिती मिळतेय. पावसाच्या वातावरणात तेथील परिस्थिती धुक्यात अडकल्याने बचाव कार्याला देखील अडथळा निर्माण होत आहे. मात्र परिस्थिती नियंत्रणात येताच त्यांना सुखरुप बाहेर काढल जाईल, अशी माहिती पुढे आली आहे.

रायगड जिल्हयातील महाड येथून यात्रेला गेलेले भाविक
1) संदिप गोपाळ मोरे – 49 – आकळे
2) संतोष गंगाराम उंबरकर 49- निगडे
3) श्रीपत तुकाराम मोरे 44 – निगडे
4) सुदाम शिवाजी मोरे – 48 निगडे
5)प्रदीप चंद्रकांत मोरे 34 निगडे
6) ज्ञानेश्वर सयाजी चौधरी 36 निगडे
7) राजेश भागोजी मोरे 42 निगडे
8)नितेश सकपाळ – 34 वरांध

केदारनाथ हेलिपॅड वर अडकून पडलेले 2 भाविक

1) सुदाम राजाराम मोरे – 55 निगडे

2) गोपाळ पांडूरंग मोरे 44 निगडे