देव तारी त्याला कोण मारी याचं जिवंत उदारण हे आग्रा शहरात घडले आहे. काही हल्लेखोरांनी एका तरुणाला बेदम मारहाण करून त्याला जिंवत गाडले. परंतु काही भटक्या कुत्र्यांनी त्या पीडित व्यक्तीचे प्राण वाचवले आहे. रामवती नावाच्या महिलने या घटनेबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे आणि या घटनेनंतर चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टाईम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिध्द झालेल्या वृत्तानुसार, रामवतीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तीने तक्रारात म्हटले की, तीच्या मुलावर हल्लेखोरांनी हल्ला केला. रुप असं हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा गळा दाबून त्याला मारून टाकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला मृत समजून एका टेकड्यावरच्या खड्ड्यात पुरण्यात आले. पण, सुदैवाने त्याच रात्री परिसरातील काही भटक्या कुत्र्यांनी माती खोदून त्याला वाचवले.
महिलेने पोलिस ठाण्यात तक्रारीत म्हटले की, अंकीत, गौरव, करण आणि आकाश नावाचे चार तरुण १८ जुलै रोजी संध्याकाळी तिच्या घरी आले होते. त्यांनी रुपला गावाबाहेरील एका शेतात नेले. तेथे त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याच्या गळ्यात दोरी बांधून त्याचा गळा दाबून हत्या केली. यानंतर एका टेकडीवर खड्डा खणून त्या रुपला गाडले.
पुढे तीनं सांगितले की, या घटनेदरम्यान एक चमत्कार घडला आणि रक्ताच्या वासाने आकर्षित झालेल्या कुत्र्यांनी माती खोदण्यास सुरुवात केली. रुप बेशुध्द होता तरी देखील कुत्र्यांच्या हालचालींमुळे तो पुन्हा शुध्दीवर आला. यानंतर तो कसा बसा जवळच्या गावात गेला. तिथे स्थानिक लोकांनी त्याला ओळखले आणि त्याला तात्काळ रुग्णालयात नेले. तेथे उपचार सुरु केले.
रामवती यांच्या म्हणण्यानुसार, १८ जुलै रोजी तिच्या मुलाचा काही लोकांशी वाद झाला होता. यादरम्यान एका व्यक्तीने अपशब्द वापरल्याबद्दल रुप यांनी आक्षेप घेतला. या घटनेनंतर रुपला काही लोकांनी मारहाण केली आणि हत्या करण्यात प्रयत्न केला.