धक्कादायक! युवा कॉंग्रेस नेत्याने आपल्या गर्लफ्रेंडवर केले चाकूने वार,पहा व्हिडीओ

0
807

 

मध्य प्रदेशातील एका युवा कॉंग्रेस नेत्याने आपल्या गर्लफ्रेंडवर (Girlfriend) चाकूने (Stabs) वार केल्याची थरारक घटना घडली आहे. भररस्त्यात तरुणाने 19 वर्षीय तरुणीवर वार केले. ही घटना एकाने फोनमध्ये कैद केली आहे. या घटनेचा (Viral Video) व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना शहरातील निमूच येथे 31 जुलै रोजी घडली आहे. तरुणीच्या प्रकृती स्थिर असल्याची माध्यमांना माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुलदीप यादव असं हल्ला करणाऱ्या तरुणाचे नाव आहे तर तस्लीम असं हल्ला झालेल्या तरुणीचे नाव आहे. हल्ला झाल्यानंतर तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भररस्त्यात हल्लेखोराने तुला किती बॉयफ्रेंड आहे ? अशी विचारणा केली आणि त्यानंतर तिच्यावर हल्ला चढवला. कुलदीप यादवने तस्लीमवर आरोप केला की, तीनं माझी फसवणूक केली. या मुलींना फक्त पैसे हवेत, असा आरडाओरड व्हिडिओत दिसत आहे.

 

तरुणीवर धारदार शस्त्राने वार केल्याने ती रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडली होती. स्थानिकांनी तीला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. एकाने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी या घटनेचे गांभिर्य लक्ष्यात घेऊन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केले. तरुणीची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.

पहा व्हिडीओ:


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here