‘या’ बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; फक्त वयाची अट लागू,झटपट अर्ज करा!

0
318

नोकरीच्या शोधात असाल आणि बँकेत नोकरी करण्याची इच्छा असेल तर, तुमच्याकडे मोठी संधी आहे. भारतीय स्टेट बँकेत मेगा भरती (Govt Job In State Bank Of India Recruitment 2024) सुरू आहे. वेगवेगळ्या पोस्टसाठी भारतीय स्टेट बँकेनं भरती जाहीर केली आहे. बँकेकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, भारतीय स्टेट बँकेत ऑफिसर (Sportsperson), क्लेरिकल (Sportsperson) पदांसाठी भरती जाहीर करण्यात येत आहे. ऑफिसर पदांसाठी 17 जागा आणि क्लेरिकल पदांसाठी 51 जागांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. दोन्ही पदांसाठी वयोमर्यादा 20 ते 30 वर्ष आहे. तर, या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट आहे. त्यामुळे जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल, तर

भारतीय स्टेट बँक भरती प्रक्रिया 2024
ऑफिसर (Sportsperson)
शैक्षणिक पात्रता : पदवी, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रतिनिधित्व

एकूण जागा : 17

वयोमर्यादा : 20 ते 30 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 ऑगस्ट 2024

अधिकृत संकेतस्थळ : sbi.co.in

क्लेरिकल (Sportsperson)
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी

एकूण जागा : 51

वयोमर्यादा : 20 ते 30 वर्ष

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 ऑगस्ट 2024

अधिकृत संकेतस्थळ : sbi.co.in

अर्ज कसा कराल?
भारतीय स्टेट बँकेनं जारी केलेल्या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 असणार आहे. तर, भरतीप्रक्रियेंतर्गत जारी करण्यात आलेल्या जागांसाठी वयाची अटही घालण्यात आली आहे. तुम्ही अर्ज करण्याचा विचार करत असाल, तर त्यासाठी तुमचं वय 20 ते 30 वर्ष असणं आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्ही भारतीय स्टेट बँकेच्या sbi.co.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच ‘एबीपी माझा’ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुणांपर्यंत सरकारी नोकरीच्या भरतीची माहिती दिली जाते. संबंधित संकेतस्थळाला भेट देऊन पात्र उमेदवार नोकरीसाठी अर्ज करु शकतील.