भारतीय हॉकी संघाने चमकदार कामगिरी करत पहिला सामना जिंकला. टीम इंडियाने रोमहर्षक सामन्यात न्यूझीलंडचा 3-2 असा पराभव केला. भारताकडून मनदीप सिंग, विवेक सागर आणि हरमनप्रीत सिंग यांनी गोल केले. हरमनप्रीतने 59व्या मिनिटाला टीम इंडियासाठी विजयी गोल केला. पहिल्या क्वार्टरमध्ये न्यूझीलंडने 0-1 अशी आघाडी घेतली होती. यानंतर भारताने दुसऱ्या क्वार्टरमध्ये पुनरागमन करत 1-1 अशी बरोबरी साधली. टीम इंडियाने तिसऱ्या क्वार्टरमध्ये 2-1 अशी आघाडी घेतली होती. पण चौथ्या क्वार्टरमध्ये न्यूझीलंडने पुनरागमन केले आणि सामना 2-2 असा बरोबरीत सुटला. शेवटी हरमनप्रीतने विजयी गोल करत भारताला विजय मिळवून दिला.