गुरुग्राममध्ये पाण्यात बुडाल्या तरुणाच्या लक्झरी कार, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, ‘माझी BMW….’

0
298

दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राम मध्ये पावसामुळे रस्ते जलमय झाले आहेत. कोट्यवधींच्या आलिशान गाड्या पावसाच्या पाण्यात तरंगत आहेत. गुरुग्राममधील एका रहिवाशाचा दावा आहे की, शहरात झालेल्या अतिवृष्टीनंतर त्याच्या महागड्या गाड्यांचे नुकसान झाले आहे. गजोधर सिंग नावाच्या रहिवाशाने त्याची 83 लाख किंमतीची BMW M340i पाण्यात बुडाल्याचा व्हिडिओ शेअर केला.

या समस्येबद्दल गजोधरने गुरुग्राम अधिकाऱ्यांना प्रश्न केला आणि इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करताना लिहिले आहे की, ‘मी माझा कर आणि सर्व बिले भरतो जेणेकरून मला माझे घर दिसेल, माझी BMW, Mercedes, i20 पाण्याखाली गेली आहे. परिस्थिती सुधारण्यासाठी अद्याप कोणीही अधिकारी पुढे आलेले नाहीत. या घटनांमुळे मी खूप भारावून गेलो आहे.’
क्रेनचीही मदत मिळाली नाही –

गजोधर यांनी सांगितले की, त्यांनी त्यांच्या गाड्या उचलण्यासाठी क्रेन मागण्याचा प्रयत्न केला पण एकही क्रेन खोल पाण्यात पोहोचू शकली नाही. त्याच्या व्हिडिओमध्ये गुरुग्रामच्या पॉश सेक्टर 57 मधील त्याच्या घराबाहेर पाणी भरलेले दिसत आहे.
सिंग यांनी इंस्टाग्रामवर लिहिले, ‘हे मुंबई किंवा बेंगळुरू नाही, भारतातील मेट्रो सिटी गुरुग्राममध्ये तुमचे स्वागत आहे.’ त्यांनी हे प्रकरण स्थानिक अधिकाऱ्यांना टॅग करत त्यांची दुर्दशा त्यांच्या लक्षात आणून देण्याचे आवाहन केले.

पहा व्हिडिओ –

instagram.com/reel/C91aahEPq5P