‘या’ पाकिस्तानी क्रिकेटपटूची हरभजनला शिवीगाळ, वादाचं कारण काय?

0
151

 

पाकिस्तान क्रिकेटची आर्थिक स्थिती वाईट आहे. तिथे मोठ्या प्रमाणावर मतभेद, वाद आहेत. T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये पाकिस्तानी टीमने खराब प्रदर्शन केलं. पाकिस्तान क्रिकेटला स्वत:मध्ये बदल, सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. मात्र, तिथले क्रिकेटपटू आपसात वाद घालतात किंवा अन्य देशाच्या क्रिकेटपटूंबद्दल वाईट बोलतात. वाईट मुद्दामून बोलतात कारण यावरच त्यांचं दुकान चालतं. असं काही तरी प्रक्षोभक बोलून कमाई करता येते. म्हणून स्वत:मध्ये सुधारणा करण्याऐवजी हे क्रिकेटर्स भारतीय क्रिकेटर्सबद्दल उलट-सुलट बोलत असतात. पाकिस्तानचा माजी क्रिकेटर तनवीर अहमदने भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगच्या बाबतीत जाहीरपणे उद्धट वर्तन केलं. शिवीगाळ करण्यापर्यंत तनवीरची मजल गेली.

तनवीरने हरभजनला आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शिवी दिली. त्याला टुकार माणूस म्हटलं. “हरभजन स्वत: पाकिस्तानी खेळाडूंना भेटतोय, मग तो भारतीय टीमने पाकिस्तानात जाऊ नये असं का म्हणतो?” असा सवाल तनवीर अहमदने विचारला. हरभजनने एक वक्तव्य केलं, त्यावर तनवीरने अशी रिएक्शन दिलीय. भारतीय टीमच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करुन चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात टीम पाठवू नये, असं हरभजनने म्हटलं होतं.

‘पाकिस्तानात का जावं?’

हरभजनने IANS ला एक इंटरव्यू दिला, त्यात त्याने विचारलेलं की, भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानात का जावं?. पाकिस्तानातील परिस्थिती ठीक नाहीय. दरवेळी तिथे काही ना काही घडत असतं. त्यामुळे भारतीय टीमच्या सुरक्षेला धोका आहे. टीमला पाकिस्तानात न पाठवण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयाशी सहमत असल्याच हरभजनने म्हटलं होतं.

शोएब मलिकच म्हणण काय?

क्रिकेटच्या वनडे फॉर्मेटमधून रिटायरमेंट स्वीकारणारा पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकने भारतीय खेळाडूंना चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात येण्याची विनंती केली आहे. खेळामध्ये राजकारण नको असं शोएब मलिकच मत आहे. पाकिस्तानी लोक चांगले आहेत. भारतीय खेळाडू इथे आले, तर त्यांना हा अनुभव येईल असं शोएब म्हणाला.

पहा पोस्ट: