धक्कादायक! नेपाळमध्ये मोठी विमान दुर्घटना, अपघाताचा थरारक Video व्हायरल

0
629

नेपाळची राजधानी काठमांडूत सौर्य एअर लाईन या खाजगी कंपनीचे विमान टेकऑफ घेत असताना क्रॅश झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. नेपालच्या नागरी विमानन प्राधिकरणाने या विमानात 19 प्रवाशांपैकी 18 प्रवाशांच्या मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले आहे. विमानात सौर्य एअरलाईन्सचे कर्मचारी प्रवास करीत होते. सकाळी 11.11 वाजता पोखरा येथे जाण्यासाठी त्रिभुवन विमानतळावरुन हे विमान उडाले आणि आकाशात तिरपे होत थेट जमीनीवरच कोसळले. रनवेवर काही अंतरावर एयरपोर्टच्या पूर्व भागात ते कोसळले आणि त्याने लागलीच पेट घेतला. नेपाळमधील काठमांडू येथील त्रिभुवन विमानतळावर हा भयंकर अपघात घडला आहे. या विमानाच्या शेवटच्या क्षणांचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

केवळ पायलट बचावला
विमानाचे पायलट 37 वर्षीय पायलट कॅप्टन एम. आर. शाक्य यांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. त्यांना क्रॅश साईटवरून रेस्क्यू केले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या विमानाला ( बम्बार्डियर CRJ-200ER ) साल 2003 मध्ये तयार केले होते. विमानला एयरलाइंस स्टाफ दुरुस्तीसाठी घेऊन चालला होता. पोखरा येथे दुरुस्तीसाठी या विमानाला घेऊन जात असताना हा अपघात घडला. विमानाने रवने 2 वरुन टेक ऑफ घेतले आणि काही क्षणातच ते रनवे 20 वर क्रॅश झाल्याचे व्हिडीओत दिसत आहे.

या विमानात दोन क्रू सदस्य आणि 17 तंत्रज्ञ होते. ते या विमानाला देखभाल दुरुस्तीसाठी पोखरा शहरात घेऊन जात होते असे विमानतळ सुरक्षा प्रमुख अर्जुन चंद ठाकुरी यांनी वृत्तसंस्था रॉयटर्सला सांगितले आहे, पायलट मनीष शांक्य यांना वाचवण्यात यश आले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे, त्यांच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नेपाळी लष्कराच्या नेतृत्वाखाली बचावकार्य सुरू आहे. विमानाने टेक ऑफ घेतल्यानंतर काही वेळातच ते विमान धावपट्टीवर कोसळल्याने त्याला मोठी आग लागली, परंतु आपत्कालीन यंत्रणेने ही आग त्वरित विझवली आणि तातडीने बचावकार्य सुरु केले आहे.

नेपाळ विमान अपघातांचा इतिहास
नेपाळमध्ये विमान अपघातांचा मोठा काळा इतिहास आहे, गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात मोठा विमान अपघात झाला होता, त्यात 72 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. यती एअरलाईन्सचे विमान पोखरा विमानतळावर उतरण्यापूर्वीच कोसळले होते. त्यातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला.

पहा  व्हिडीओ: