मधल्या सुट्टीत जेवताना शाळेची भिंत कोसळलीगुजरातमधील वडोदरा शहरातील एका शाळेत मोठी दुर्घटना घडली आहे. शाळेत मधल्या सुट्टीत मुले जेवत असताना शाळेची भिंत कोसळली. या घटनेत वर्गात एका कोपऱ्यातील सहा मुले भिंतीसोबत खाली पडले.
गुजरातमधील वडोदरा शहरातील एका शाळेत मोठी दुर्घटना घडली आहे. शाळेत मधल्या सुट्टीत मुले जेवत असताना शाळेची भिंत कोसळली. या घटनेत वर्गात एका कोपऱ्यातील सहा मुले भिंतीसोबत खाली पडले. या घटनेत एक मुलगा गंभीर जखमी झाला आहे. पाच जण जखमी झाले. सर्व जखमी विद्यार्थ्यांना वैद्यकिय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वडोदरा येथील वाघोडिया रोडवरील गुरुकुल चौकावरील श्री नारायण विद्यालयात ही घटना घडली आहे. मुलं जेवण करत असताना अचानक एका बाजूची संपुर्ण भिंत मुलांसोबत खाली कोसळते. ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली. या घटनेनंतर विद्यार्थ्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले. मुलांमध्ये घबराट निर्माण होताच, वर्गातून बाहेर पळण्यास सुरु केले.
शाळेत भिंत कोसळल्यानंतर शिक्षकांनी अग्निशमनदलाला घटनेची माहिती दिली. बचाव कार्य तात्काळ सुरु झाले. जखमी मुलांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रशासनाकडून शाळेची सर्व आवश्यक प्रमाणपत्रे आणि कागदपत्रे असल्याचा दावा शाळा व्यवस्थापनाकडून केला जात आहे तरी शाळेची इमारत अतिशय जीर्ण असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. यापूर्वी वडोदरा येथे हर्णी बोट दुर्घटनेत १२ मुलांचा मृत्यू झाला.
पहा थरकाप उडवणारा व्हिडिओ:
#WATCH | Gujarat: One student injured after a wall collapsed at a private school in Vadodara (19/07) pic.twitter.com/BTqTwlPTDH
— ANI (@ANI) July 20, 2024