हैद्राबाद येथील लाजिरवाणी घटना! डान्स टीचरकडून पहिलीच्या विद्यार्थींचा लैंगिक छळ, आरोपीला लाथा बुक्क्यांचा मार (Watch Video)

0
330

हैद्राबाद येथील मेडचल बोदुप्पल येथे एक लाजिरवाणी घटना घडली आहे. किरण इंटरनॅशनल स्कूलच्या डान्स टीचरने इयत्ता पहिलीच्या विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर संतप्त कुटुंबियांनी शाळेत जाऊन आरोपी शिक्षकाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली, या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पीडितेच्या कुटुंबीयांनी प्रशासनाकडे न्यायाची मागणी केली आहे. सध्या पोलिसांनी अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी डान्स टीचरला अटक करून कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. हैदराबादसारख्या मोठ्या महानगरात अशा घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

पहा व्हिडीओ:

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here