One Plus (1+) प्रीमियम रेंजमधील फोन प्रतिष्ठेचं प्रतीक मानले जातात. काही प्रमाणात iphone ला ही मागे टाकेल असे फीचर्स असणाऱ्या या फोनची मागणीही खूप होती. मागील काही काळात वन प्लसच्या अनेक आवृत्त्या सुपरहिट झाल्या. पण त्यानंतर अनेक कंपन्यांनी हे फीचर्स कमी किमतीत देऊन वन प्लसला टक्कर दिली. रेडमी, रिअल मी, शाओमीच्या उत्पादनांची मार्केटमध्ये मागणी वाढू लागताच आता वन प्लसने सुद्धा परवडणाऱ्या रेंजमधले फोन बाजारात लाँच केले आहेत. त्यातलाच एक नव्याने लाँच झालेला फोन म्हणजे वन प्लस नॉर्ड सीई 4. वन प्लसच्या आतापर्यंतच्या सर्व फोनमधील, सर्वात बेस्ट कॅमेरा व बॅटरीचा हा फोन आपण का खरेदी करायला हवा किंवा का खरेदी करू नये याविषयी सविस्तर जाणून घेऊया..
वन प्लस नॉर्ड सीई 4 हा फोन २७ जूनला लाँच झाला तेव्हा त्याची किंमत १९ हजार ९९९ रुपये होती. आता एक एक करून आपण या फोनचे फीचर्स पाहूया.
1) डिस्प्ले
वन प्लसच्या या फोनची स्क्रीन ६.६७ इंच आहे
AMOLED डिस्प्लेसह फोनचा रिफ्रेश रेट 120Hz असून ब्राईटनेस २१०० nits आहे. तसं पाहायला गेलं तर यातील १२००nits (High Brightness Mode) सुद्धा पुरेसा ठरतो पण त्याहीपेक्षा अधिक सोय उपलब्ध असल्याने ब्राईटनेसची समस्या येणार नाही.
AMOLED डिस्प्ले असल्यामुळे रंग सुद्धा तुम्हाला ब्राईट दिसतील. शिवाय स्क्रीनला Aqua टच फीचर आहे.
ऍक्वाटच म्हणजे काय जेव्हा तुमच्या मोबाईल स्क्रीनवर पाण्याचे थेंब पडतात किंवा समजा तुमची बोटं ओली असतील आणि तुम्ही फोन वापरत असाल तर तेव्हा अनेकदा आपण एखादं ऍप उघडायला जातो आणि दुसरंच सुरु होतं. पण Aquatouch फीचर तुमच्या बोटावरचा किंवा स्क्रीनवरचा ओलावा स्क्रीन ओळखून त्यानुसार सेन्सटीव्हीटी वाढते किंवा कमी होते. यामुळे चुका होण्याचं प्रमाण ९५ टक्के कमी होते.
२) कॅमेरा
बॅकचा प्रायमरी कॅमेरा हा 50MP Sony LYT600 sensor चा आहे तर बॅक सेकंडरी कॅमेरा 2 MP सेन्सरचा आहे. पुढील कॅमेरा १६ मेगापिक्सेल आहे.
कॅमेरासाठी OIS ऑप्टिकल इमेज स्टॅबलायजेशन सिस्टीम वापरलेली आहे. कमी प्रकाशात किंवा हालचाल होत असताना सुद्धा कॅमेरा स्थिर फोटो काढू शकतो.
३) RAM -ROM
सध्या अनेक फोनमध्ये १२ जीबी RAM आहे पण या फोनच्या 128 जीबी व 256 जीबी दोन्हीमध्ये 8GB LPDDR4X RAM दिला आहे. तुम्ही म्हणाल ८ जीबी रॅम, १२ जीबी रॅम पेक्षा चांगला कसा? तर Nord CE4 Lite हा OxygenOS 14 सॉफ्टवेअर स्टोरेजसाठी बेस्ट आहे. कारण यात One Plus चे RAM-Vita and ROM-Vita हे फीचर्स वापरले जातात.
RAM-Vita म्हणजे काय तर, OnePlus’s च्या फोनमध्ये AI चा वापर करून तयार केलेली ही प्रणाली आहे. ज्यात फोनचा वापर, गरज ओळखून रिकामी कॅपॅसिटी (RAM) स्टोरेजसाठी वापरली जाते. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर वन प्लसने केलेल्या दाव्यानुसार बॅकग्राउंडला २६ ऍप चालू असताना पण तुम्ही सर्वोत्तम स्पीडमध्ये फोन वापरू शकता.
४) बॅटरी
फोनमध्ये ५५०० mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.
तुम्ही जर युट्युब व्हिडीओ बघत असाल तर सलग २० तास तुम्ही फोन वापरू शकता
व्हिडीओ कॉलसाठी वापर करत असाल तर ४७ तासाहून अधिक वापरू शकता.
अगदी कॉल आणि मेसेजसाठी वापर किंवा बेसिक युज असेल तर दीड ते २ दिवस बॅटरी लाईफ टिकू शकते.
यामध्ये रिव्हर्स वायर चार्जिंगची सोय पण आहे म्हणजे इमर्जन्सीमध्ये आपण हेडफोन किंवा आपल्या वेगळ्या उपकरणांना जोडून सुद्धा फोन बंद होणं थांबवू शकता.
अर्थात या फोनचे जसे चांगले फीचर्स आहेत तशा काही मर्यादा सुद्धा आहेत.
1) फोनला १ ते १०० टक्के अशा चार्जिंगसाठी सांगितल्याप्रमाणे ५२ मिनिटे लागू शकतात.
2) फोनमध्ये Qualcomm Snap Dragon 695 Chipset वापरलं गेलंय. फोनचा एकूण दर्जा हा चिपसेट वर अवलंबून असतो जे फार जुनं आहे, त्यामुळे कंपनीला उत्पादन खर्च कमी पडतो, त्या तुलनेत २० हजार ही रक्कम ग्राहकांसाठी जास्त आहे.
३) फोनमध्ये व्हिडीओ शूटिंग साठी 4K रिजोल्यूशन उपलब्ध नाही