बँकेत नोकरी हवी असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आली आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यास सुरुवात झाली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 195 अधिकारी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 26 जुलै आहे. त्यापूर्वी पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये विविध स्केलच्या अधिकारी पदांची भरती सुरु झाली आहे. त्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन अर्ज करावा लागणार आहे. बँकेच्या विविध विभागांमध्ये स्केल II, III, IV, V आणि VI पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांकडे आवश्यक पात्रता आहे आणि या रिक्त पदांसाठी अर्ज करण्याची इच्छा आहे ते विहित नमुन्यात अर्ज करू शकतात. या पदांसाठीची अधिसूचना काल म्हणजेच 10 जुलै रोजी प्रसिद्ध झाली असून फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 26 जुलै 2024 आहे. तुमचे ऑफलाइन अर्ज 26 जुलैपूर्वी नमूद केलेल्या पत्त्यावर पोहोचले पाहिजेत.
एकूण 195 पदांसाठी पात्र उमेदवारांची भरती केली जाईल. या रिक्त जागा इंटिग्रेटेड रिस्क मॅनेजमेंट, फॉरेक्स आणि ट्रेझरी, आयटी, डिजिटल बँकिंग, सीआयएसओ, सीडीओ अशा विविध विभागांसाठी आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक अशी अनेक पदे भरली जाणार आहेत.
अर्ज करण्यासाठी पात्रता काय?
विविध पदांसाठी अर्ज करण्याची पात्रता आणि वयोमर्यादा पदानुसार आहे. पदवीधर, सीए, सीएमए, सीएफए, बीई, बीटेक, लॉ इत्यादी अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार अर्ज करू शकतात. सविस्तर माहिती अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे. वयोमर्यादा देखील पोस्टनुसार 50 वर्षे, 45 वर्षे, 40 वर्षे, 38 वर्षे आणि 35 वर्षे आहे.
कसा कराल अर्ज?
या पदांचे तपशील जाणून घेण्यासाठी तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता. bankofmaharashtra.in. या वेबसाईटवर तुम्हाला या संदर्भात आणखी काही संपर्क करायचा असल्यास, तुम्ही bomrpcell@mahabank.co.in या ईमेल पत्त्यावर करू शकता. या पदांसाठीचे अर्ज फक्त ऑफलाइन असतील. यासाठी तुम्हाला पोस्टाच्या नावासह पूर्ण केलेला अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावा लागेल. स्पीड पोस्टद्वारेच अर्ज पाठवा. अर्ज पाठवण्यासाठीचा पत्ता हा – महाव्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र, एचआरएम विभाग, मुख्य कार्यालय, ‘लोक मंगल’ 1501, शिवाजी नगर, पुणे – 411005.
फी किती असणार?
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 1180 रुपये शुल्क भरावे लागेल. तुम्हाला या रकमेचा डिमांड ड्राफ्ट बनवावा लागेल. तो अर्जासोबत सबमिट करावा लागेल. आरक्षित श्रेणीसाठी शुल्क 118 रुपये आहे.
निवड कशी असणार?
या पदांवरील निवडीसाठी उमेदवारांना लेखी परीक्षेला बसावे लागेल. यानंतर मुलाखत घेतली जाईल. दोन्ही टप्पे पार करणाऱ्या उमेदवारांची निवड अंतिम असेल.
पगार किती मिळणार?
निवड झाल्यास, पदानुसार वेतन देखील बदलते. स्केलनुसार वेतन देण्यात येणार आहे. वरच्या पदांसाठी पगार हा 1 लाख 40 हजार रुपये ते 1 लाख 56 हजार रुपये प्रति महिना असणार आहे. त्याखालील पदांसाठी 1 लाख 20 हजार रुपये ते 1 लाख 35 हजार रुपये प्रति महिना पगार असणार आहे. तसेच काही पदांसाठी कमाल पगार 1 लाख रुपयांपर्यंत आहे. तर काही पदांसाठी पगार हा 93 हजार रुपये आहे.