एक चक्रावून टाकणार प्रकरण समोर आलय. त्या बद्दल ऐकल्यानंतर कोणही हैराण होईल. एक विवाहित महिला अचानक आपल्या नवऱ्याला सोडून गायब झाली होती. नवरा मागची सात वर्ष तिचा शोध घेता होता. या प्रकरणात पत्नीसोबत सासरा सुद्घा गायब होता. नवऱ्याला जेव्हा पत्नी आणि त्याच्या वडिलांचा शोध लागला, तेव्हा त्याला धक्का बसला. दोघांनी आपसात लग्न केलं होतं. चंदौसी येथे दोघे राहत होते. नवऱ्याने लगेच या बद्दल पोलिसांना कळवल. मानवी नात्यांची चिरफाड करणारं हे चक्रावून टाकणार प्रकरण उत्तर प्रदेशच्या बदायूमधील आहे.
पोलीस दोघांना पकडून पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आले. त्यावेळी समजलं की, सून सासऱ्यासोबत चार वर्षांपूर्वीच पळून गेली होती. दोघांनी लग्न केलं. त्यांना आता एक मुलगा आहे. मी नवऱ्यामुळे हैराण होती, असं विवाहितेने सांगितलं. तिने तिच्या मर्जीने सासऱ्यासोबत पळून जाऊन लग्न केलं. लग्नाच्यावेळी नवरा अल्पवयीन होता. त्यामुळे त्या लग्नाला मी मानत नाही, असं तिने सांगितलं. सासऱ्यासोबत झालेला विवाह तिला मान्य आहे. त्यामुळे पोलिसांना दोघांना सोडाव लागलं. पण हे प्रकरण आता या भागात चर्चेचा विषय बनलय.
तेव्हापासून तो दोघांच्या शोधात
बदायूं जिल्ह्यातील दबतोरी चौकी क्षेत्रातील हे प्रकरण आहे. काही दिवसांपूर्वी एका युवकाने बिसौली पोलिसांकडे तक्रार दिली. त्याने आरोप केला की, 2016 साली त्याचं लग्न वजीरगंज क्षेत्रातील एका युवती बरोबर झालं. वर्षभर दोघे एकत्र राहिले. पुढच्यावर्षी पत्नी आणि सासरा दोघे गायब झाले. तेव्हापासून तो दोघांच्या शोधात होता. सात वर्षानंतर त्याला कळलं की, दोघे चंदौसीमध्ये राहतायत. दोघांनी लग्न सुद्धा केलय.
महिलेला नवऱ्यासोबत का नव्हत रहायच?
पोलिसांनी तात्काळ कारवाई करत महिला आणि तिच्या सासऱ्याला पकडलं. चौकशीत समजलं की, महिला पतीमुळे हैराण होती. लग्नाच्यावेळी पती अल्पवयीन होता. जास्त शिक्षण झालेलं नव्हतं. काही कमाई नव्हती. म्हणून ती मर्जीने सासऱ्यासोबत गेली. दोघांनी कोर्ट मॅरेज केलं. आता दोघांना दोन वर्षांचा मुलगा आहे. दोघे आपल्या आयुष्यात आनंदी आहेत. गावात बदनामी होईल म्हणून ते चंदौसी येथे राहत होते.