धक्कादायक ! चिपळूण येथे उड्डाणपुलाचे खांब तोडताना रोप तुटल्याने तीन कामगार जखमी; पहा व्हिडीओ

0
134

चिपळूणमधील बहादूरशेख नाका येथील उड्डाणपुलाच्या कामादरम्यान मोठी दुर्घटना घडली. शुक्रवारी सायंकाळी उड्डाणपुलाच्या एका पिलरचे काम पाडताना कामगारांनी स्वत:ला बाधलेला रोप अचानक तुटला आणि कामगार खाली पडले. ही दुर्घटना कामगारांच्या जीवावर बेतली. ज्यात तीन कामगार गंभीररीत्या जखमी झाले. या दुर्घटनेचे एक अतिशय भीतीदायक दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत दिसते की, पुलाचा पिलर कोसळल्यानंतर एका जखमी कामगाराला उचलून रुग्णालयात नेले जात आहे. तसेच, दुसरीकडे कोसळलेल्या पुलाच्या खांबातील सळ्यांमध्ये अडकलेल्या एका कामगाराची क्रेनच्या मदतीने सुटका केली जात आहे. यामुळे पुन्हा एकदा हे काम सुरू असताना कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पोस्ट पहा:

instagram.com/reel/C9DS8a7yoOq

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here