सांगली : सेल्फीचा मोह जीवावर बेतला, प्रेयसी वाचली मात्र तो नदीत बुडाला

0
520

माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : सेल्फी काढण्यासाठी कृष्णा नदीमध्ये प्रेयसीसह गेलेल्या तरुणाला आपला जीव गमवावा लागला असून या घडलेल्या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, सांगलीतील कृष्णा नदीमध्ये प्रियकर आणि प्रेयसी असे दोघेही सकाळी बंधाऱ्यावर सेल्फी काढण्यासाठी गेले होते. कृष्णेच्या पाणी पातळीमध्ये अचानक वाढ झाल्याने पाणी बंधाऱ्यावरून वाहू लागले.यावेळी प्रेयसी मात्र बंधाऱ्यावरून काठावर आली. परंतु प्रियकर त्याच ठिकाणी बंधाऱ्यावरून सेल्फी काढत होता.

पाणी पातळी वाढल्याने संबंधित तरुण देखील काठावर येऊ लागला होता. प्राणत्य बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागल्याने त्याचा पाय घसरल्याने तो कृष्णा नदीत बुडाला. घटनास्थळी पोलीस आणि बचाव पथक दाखल झाले असून, बुडालेल्या तरुणाचा सध्या शोध सुरू आहे. सांगलीत गेल्या चार दिवसात ही दुसरी घटना आहे.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here