अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यात मुकेश-नीता अंबानीचा नातवंडांसोबतचा हृदयस्पर्शी व्हिडीओ

0
84

5 जुलै रोजी, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांनी नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये त्यांचा संगीत सोहळा भव्य शैलीत साजरा केला. या दरम्यान, मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा नातवंडांसोबतचा हृदयस्पर्शी व्हिडीओ इंटरनेटवर सरर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हायरल क्लिपमध्ये, मुकेश अंबानी आणि नीता अंबानी, त्यांची नातवंडे पृथ्वी, आदिया, कृष्णा आणि वेद यांच्यासोबत कार राईड करताना दिसता आहेत. ‘चक्के पे चक्का’ गाण्यावर जुन्या हिंदी चित्रपटाचा एखादा सीन असावा अशी ही दृश्य आहेत. या व्हिडिओमधील स्नेहपूर्ण क्षण हे संगीत सोहळ्याचे एक ठळक वैशिष्ट्य बनले आहेत, जे अंबानी कुटुंबातील जिव्हाळा आणि आनंद दर्शवतात.

पहा व्हिडीओ: